Nawazuddin Siddiqui: सासू सूनेच्या वादात अडकला नवाज ! वैतागून शेवटी सोडलं घर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui: सासू सूनेच्या वादात अडकला नवाज ! वैतागून शेवटी सोडलं घर..

Nawazuddin Siddiqui: बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. सध्या सिद्दीकीचे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीमधील मतभेद सुरु आहे.त्याची आई आणि पत्नीमधील वाद वाढत चालला आहे.

आता माहिती समोर आली आहे की, या सगळ्याला कंटाळून नवाजुद्दीनने त्याचं घर सोडलं आहे आणि जोपर्यंत त्याची पत्नी आणि आई यांच्यातील वाद मिटत नाही तोपर्यंत तो एका हॉटेलमध्ये शिफ्ट झाला आहे.

बॉलीवूड हंगामातील एका वृत्तानुसार, नवाबच्या मित्राने सांगितले आहे की, जोपर्यंत त्याचे वकील त्याच्या राहत्या घरी 'नवाब' येथे कायदेशीर प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत नवाज हॉटेलमध्येच राहणार आहे.

नवाजने मोठ्या इच्छेने आणि कष्टाने मुंबईत त्याचा ड्रीम पॅलेस बनवला आहे. त्याच्या त्याच्या वडिलांच्या नावावरून घराचे नाव 'नवाब' असं ठेवण्यात आले आहे. आलिशान चमकदार पांढर्‍या बंगल्यात सहा बेडरूम, दोन मोठे हॉल आणि दोन लॉन आहेत.

दरम्यान, आलिया ही अभिनेत्याची पत्नीही नसल्याचा दावा नवाजच्या आईने केला आहे. दुसरीकडे, आलियाने नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला जेवण आणि मूलभूत सुविधा, अगदी बाथरूम वापरण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप करत कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. त्याने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले असून त्यांच्या खोलीबाहेर २४ तास बॉडी गार्ड असतात.

आलियाने तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत नवाज आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर पत्नी आलियाने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबईच्या अंधेरी न्यायालयाने नवाजला नोटीस बजावली आहे.