
Nawazuddin Siddiqui : 'व्हाट्स अप चॅट पहा म्हणजे कळेल कोण खोटं अन् कोण खरं!' आलिया पुन्हा अलर्ट
Nawazuddin Siddqui ex wife aliah share whats app : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या कौटूंबिक संघर्षामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी होताना दिसतो आहे. आता तर त्याच्या पत्नीनं नवाझुद्दीनवर बलात्काराचा आरोप केला आहे. एवढचं काय तर नवाझुद्दीनच्या भावानं देखील त्याच्यावर टीका केली आहे.
आलियानं तर मी काही खोटे बोलत नाही.नवाझुद्दीननं मला मुलांना सांभाळण्यासाठी जे पैसे दिले त्याची चुकीची आकडेवारी सोशल मीडियावर सांगितली होती. त्यामुळे इतरांना तो फार ग्रेट वाटायला लागला. मात्र तो किती खोटं बोलतो आहे मला सांगायचे आहे. यासाठी आलियानं व्हाट्स अप चॅटचे स्क्रिन शॉट शेयर केले आहेत. त्यामुळे नवाझुद्दीनची कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. आलियानं वेगवेगळे आरोप करुन वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि नवाझुद्दीन यांच्यावर सोशल मीडियावर टीका होताना दिसते आहे. नवाझुद्दीननं मला भररात्री घरातून बाहेर काढलं. यावर अभिनेत्यानं तर सोशल मीडियावर वेगळीच प्रतिक्रिया दिली होती. यात आलियाचा राग अनावर झाला आहे. नवाझनं ट्विटरवर एक मोठी पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे नक्की प्रकरण काय आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
नवाझुद्दीननं जी पोस्ट केली त्यावर आलियानं दोघांच्या संभाषणतले व्हाट्स अप चॅट सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. नवाझनं आपल्याला जे लाखो रुपये दिले असे सांगितले ते खोटं आहे. तू कधी तीन ते चार लाख रुपये पाठवले नाही आणि बाता अशा करतो की, पाच ते सहा लाख रुपये दिले. आलियाच्या त्या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.