‘बदला लेना मजबुरी नहीं, जरुरत बन गई है’, राजीव खंडेलवालची ‘नक्षलबारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 21 November 2020

पार्थ मित्रा दिग्दर्शित या सीरिजमध्ये जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठी सुरु असलेली चळवळ आणि व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला लढा दाखवण्यात येणार आहे.

मुंबई- सिनेमा, सिरिअलसोबतंच आता प्रेक्षक वळले आहेत ते डिजीटल युगाकडे. डिजीटल युगातील माध्यमात वेब सिरीज हा सगळ्यांचा आवडता विषय बनला आहे. या सीरिजच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर उघडपणे भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे या माध्यमाकडे पाहण्याचा तरुणाईचा कल वेगळा असल्याचं दिसून येतं. सध्या या सीरिजसाठी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता अनेक सीरिजची रेलचेल सोशल मीडियावर पाहायला मिळते. यातच आता नक्षलबारी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. नुकताच या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

हे ही वाचा: पुन्हा एकदा हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी, ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर रिलीज    

पार्थ मित्रा दिग्दर्शित या सीरिजमध्ये जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठी सुरु असलेली चळवळ आणि व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला लढा दाखवण्यात येणार आहे. या सिरीजची निर्मिती ‘जिसिम्स’अंतर्गत करण्यात येतेय. या सिरिजचं शूटींग गोव्यामध्ये पार पडलंय.

'नक्षलबारी’ ही जंगलात राहणाऱ्या लोकांची, त्यांच्या हक्कांसाठीची एक चळवळ असून व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला तो एक लढा आहे. ही वेब सीरिज या चळवळीच्या लढ्यातील महत्वाच्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत आहे. तर टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद,आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. २८ नोव्हेंबरला झी५वर ही सिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

naxalbari starring rajeev khandelwal aamir ali shreejita de tina dutta  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naxalbari starring rajeev khandelwal aamir ali shreejita de tina dutta