लग्नानंतर नयनतारा बदलली, लगेच घेतला मोठा निर्णय... ठेवली अशी अट 'Nayanthara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nayanthara makes a BIG decision after marriage with Vignesh Shivan

लग्नानंतर नयनतारा बदलली, लगेच घेतला मोठा निर्णय... ठेवली अशी अट

दक्षिणेची लेडी सुपरस्टार देखणी अभिनेत्री नयनतारा(Natyanthara) दिग्दर्शक विघ्नेश शिवन सोबत लग्नबंधनात अडकली आहे. नयनतारा आता आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतेय. पण आता बातमी आहे की लग्नानंतर नयनतारानं काही महत्त्वाचे निर्णय(Big Dicision) घेतले आहेत. चला जाणून घेऊया त्या तिच्या महत्त्वाच्या निर्णयांविषयी.

हेही वाचा: Brahmastra:'एसएस राजामौली' नंतर,आता रणबीर आलियाच्या ब्रम्हास्त्रामधे होणार का चिरंजीवीची एन्ट्री ?

मिळालेल्या वृत्तानुसार,नयनतारा आता सिनेमात इंटिमेट सीन्स (Intimate Scenes) करण्यापासून स्वतःला लांब ठेवणार आहे. नयनतारानं सिनेमातील आपल्या हिरोसोबत रोमॅंटिक सीन न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. लग्नानंतर नयनतारानंआपला पती दिग्दर्शक विघ्नेश शिवमसोबत वैवाहिक आयुष्य एन्जॉय करण्याचं ठरवलं असल्यानं अभिनय क्षेत्रापासून काही काळ ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. ब्रेक वरनं परत आल्यानंतर नयनतारा इंटिमेट सीन्स नाही करणार हे मात्र पक्क ठरवलं आहे. अर्थात अद्याप ही माहिती तिच्या जवळच्या सूत्रांकडून कळाली असली तरी स्वतः अभिनेत्रीनं याविषयी कोणतंही कन्फर्मेशन दिलेलं नाही.

हेही वाचा: मधुबाला यांच्यावर बायोपीक; किशोर कुमारांचे सुपुत्र अमित कुमार स्पष्टच बोलले

नयनतारा आगामी सिनेमा 'जवान' मध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. तसंही,शाहरुख खाननं आतापर्यंत ऑनस्क्रीन कोणताही इंटिमेट सीन देण्यापासून स्वतःला लांब ठेवलं आहे. त्यामुळे अर्थातच या सिनेमात तरी नयनताराला तिचा नो-इंटिमेसी हा क्लॉज वापरावा लागणार नाही. नयनताराच्या लग्नाविषयी विचारायचं झालं तर ९ जून रोजी अभिनेत्रीनं दिग्दर्शक विघ्नेश शिवन सोबत लग्न केलं. त्यानंतर नयनताराच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंना पाहून अभिनत्रीचे चाहते मात्र तिच्या सौंदर्याची अन् तिच्या लग्नाच्या नेत्रदीपक सोहळ्याची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. नयनताराच्या लग्नात शाहरुख खान पासून रजनीकांत यांच्या पर्यंत मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

हेही वाचा: ड्रग्ज सेवन प्रकरणात सिद्धांत कपूर जेरबंद; आता वडील शक्ती कपूर म्हणतायत...

लग्नानंतर नयनतारा देवदर्शनासाठी तिरुपतीला गेली होती. तिथे मंदीर परिसरात पायात चप्पल घालून फिरली आणि फोटो देखील काढले म्हणून तिला भरपूर ट्रोल केलं गेलं. तसंच,तिच्याविरोधात मंदीर समितीनं कायदेशीर नोटीसही बजावली. यासाठी नयनतारा आणि विघ्नेश दोघांनीही जाहीर माफी मागितली आहे. आपण चप्पल काढायला विसरलो,आम्हाला कोणाचाही अपमान करायचा नव्हता असं त्यांनी माफीनाम्यात म्हटलं आहे.

Web Title: Nayanthara Makes A Big Decision After Marriage With Vignesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top