Honeymoon : एक हनिमून असेही! नयनतारा, विग्नेश शिवनच्या स्पेनमधील खर्चाची चर्चाच चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nayanthara, Vignesh Shivan Honeymoon News

एक हनिमून असेही! नयनतारा, विग्नेश शिवनच्या स्पेनमधील खर्चाची चर्चाच चर्चा

Nayanthara, Vignesh Shivan Honeymoon News सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि दक्षिण चित्रपट उद्योगातील चित्रपट दिग्दर्शक विग्नेश शिवन ९ जून रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. त्यानंतर दोघेही अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आले. ९ ऑगस्ट रोजी त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. त्यानंतर हे जोडपे हनिमून (Honeymoon) साजरा करण्यासाठी स्पेनला रवाना झाले.

नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन सध्या स्पेनमध्ये खूप मस्ती करीत आहेत. फोटोही ते सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. दोघेही स्पेनच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर रोमान्स करताना दिसत आहेत. मात्र, हनिमूनसाठी (Honeymoon) दोघांच्या खिशातून एक रुपयाही खर्च झाला नसल्याच्या बातम्या आता येत आहेत. एक रुपयाही खर्च न करता दोघे हनिमून स्पेनमध्ये साजरा करीत आहेत.

हेही वाचा: सोशल मीडिया क्विन उर्फी जावेद टीव्हीवर हिट ठरणार? रिॲलिटी शोसाठी नान चर्चेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे ज्या हॉटेलमध्ये राहतात त्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे सुमारे २.५ लाख रुपये आहे. त्याचबरोबर हॉटेलचं भाडं एवढं महाग असताना खाण्या-पिण्यासारख्या बाकीच्या खर्चावर किती भर पडली असेल याचा अंदाज स्वतःच बांधू शकता. मात्र, आता प्रश्न असा आहे की या दोघांचे पैसे खर्च होत नसतील तर सर्व खर्च कोण करीत आहे?

रिपोर्टनुसार, नयनतारा आणि विग्नेश शिवन यांची स्पेन ट्रिप ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) नेटफ्लिक्सने (Netflix) प्रायोजित केली आहे. ३० सप्टेंबर रोजी दोघांच्या लग्नावर बनवलेला नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सने हनिमूनचे प्रायोजकत्व करून या माहितीपटाची जाहिरात केल्याचे मानले जात आहे.

Web Title: Nayanthara Vignesh Shivan Honeymoon Spain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :actresssouth film