esakal | NCBच्या कामावर टीका करणाऱ्यांना क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede Kranti Redkar

NCB वर टीका करणाऱ्यांना क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. या अटकेनंतर एनसीबी बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याची टीका काही जणांकडून होत आहे. या टीकाकारांना समीर यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे एनसीबीच्या कामाचं कौतुक करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

क्रांती रेडकरची पोस्ट

'तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. विशेषकरून एनसीबीचे प्रयत्न, त्यांचे सततचे छापे, निर्भिड मेहनत ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने जेव्हा बॉलिवूडचा संबंध येतो तेव्हाच लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या स्तुत्य कार्याचं रिपोर्टिंग माध्यमांकडून सातत्याने होत आहे. गुंडांना पकडण्याचं त्यांचं कामसुद्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुमचा पाठिंबा, प्रेम असंच वाढत जाईल अशी आशा करते. समाजात असे काही घटक आहेत, जे बॉलिवूडला लक्ष्य केल्याचं म्हणत एनसीबीला दोष देत आहेत. मी त्यांना विनंती करते की कृपया आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि नंतर टिप्पणी करा. ते दररोज संघर्ष करत असताना आपण आपल्या घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून अशा टिप्पणी टाइप करतोय. नि:स्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्यांसोबत चांगले वागुयात,' अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

हेही वाचा: वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडे यांची कामगिरी

हेही वाचा: Drugs: NCB बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करतेय का? समीर वानखेडेंचं सडेतोड उत्तर

"देशासाठी तो त्याचं वैयक्तिक आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतोय, मला त्याच्यावर खूप अभिमान आहे. जो जसा आहे तसाच मला आवडतो आणि मी त्याच्या कामाचा खूप आदर करते", असं क्रांतीने समीरविषयी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

loading image
go to top