Masaba 2: नीना - राम 'पावसात चिंब', नेटकऱ्यांच्या कल्पनेला फुटले धुमारे!

नीना गुप्ता यांनी भलेही वयाची साठी ओलांडली असली तरी त्यांचा फिटनेस आणि कामातील उत्साह हा नवीन कलाकारांना अवाक करणारा आहे.
Masaba 2 web serise news
Masaba 2 web serise newsesakal

Masaba 2: नीना गुप्ता यांनी भलेही वयाची साठी ओलांडली असली तरी त्यांचा फिटनेस आणि कामातील उत्साह हा नवीन कलाकारांना अवाक करणारा आहे. गेल्या वर्षी त्यांची मसाबा नावाची मालिका आली होती. त्यात त्यांच्यासोबत (tv entertainment) त्यांच्या मुलीनं काम केलं होतं. या मालिकेचा पहिला सीझन प्रेक्षकांना आवडला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनचे नेटकऱ्यांना वेध लागले होते. आता दुसरा सीझनमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या (neena gupta) फोटोत नीना गुप्ता आणि राम कपूर दिसत आहे. पावसात भिजलेले नीना गुप्ता, राम कपूर यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नीना गुप्ता यांच्या मसाबा मालिकेचा पहिला सीझन हा लोकप्रिय झाला होता. राम (ram kapoor) कपूर आणि नीना गुप्ता भर पावसात एका छत्रीत ते एकमेकांकडे पाहत आहेत. असा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या कल्पनेला धुमारे फुटले आहेत. त्यांनी या दोन्ही सेलिब्रेटींच्या फोटोंवर वेगवेगळ्या भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मसाबाचा ट्रेलर सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. त्यालाही नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

नेटकऱ्यांनी त्या फोटोचं कौतूक केलं आहे. नीना गुप्ता आणि राम कपूर यांची जोडी एकदम परफेक्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नीना गुप्ता यांनी ते फोटो आपल्या इंस्टावरुन शेयर केले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. नीना यांनी फोटोला कॅप्शन दिलं आहे ते म्हणजे, बरसात में...पावसात झाले चिंब.... दुसऱ्या एका छायाचित्रात हे दोन्ही कलाकार हातात छत्री घेऊन उभे आहेत. राम कपूर यांच्याबाबत सांगायचे झाल्यास ते टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी बडे अच्छे लगते है या मालिकेतून इंट्री केली होती.

Masaba 2 web serise news
Aamir Khan: 'एकदा का होईना नागराज सोबत काम करायचंय!'

मसाबा - मसाबा मालिकेविषयी सांगायचे झाल्यास, ही मालिका मुलगी आणि आई यांच्या नात्यावर प्रकाश टाकते. मायलेकींच्या नात्यातील वेगवेगळे पैलु मसाबातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेचं नेटकऱ्यांनी कौतूक केल्याचे दिसून आले आहे.

Masaba 2 web serise news
Lata Mangeshkar: लता दीदींची स्वप्नपूर्ती! कलाकारांसाठी वृद्धाश्रमाची होणार निर्मिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com