नेहा कक्करची होळी पार्टी सुरू; पतीसोबत पूल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

neha kakkar
neha kakkar

बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर होळीच्या पार्टीत दंग झाली आहे. पती रोहनप्रीत सिंग आणि भाऊ टोनी कक्कर यांच्यासोबत नेहाचा संपूर्ण परिवार होळी पार्टी एंजॉय करत आहेत. टोनीचा 'सूट तेरा टाइट' हा अल्बम नुकताच प्रदर्शित झाला असून या गाण्यावर नेहा आणि तिचे कुटुंबीय नाचताना दिसत आहेत. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रोहनप्रीतने नेहाला उचलून घेतलं असून पूलमध्ये हे दोघं डान्स करत आहेत. पूलमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण धमाल करताना दिसत आहेत. संपूर्ण कुटुंबीयांसाठी नेहाने या पार्टीचं आयोजन केलं आहे. 'मारु पिचकारी होके लेफ्ट, होके राइट. कुटुंबीयांसोबत प्री-होली फन', असं कॅप्शन नेहाने या व्हिडीओला दिलं आहे. रोहनप्रीतसोबत लग्नानंतर नेहाची ही पहिलीच होळी आहे. 

वीस लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला व्हिडीओ
नेहाचा हा होळी पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फक्त चार तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला वीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेहाच्या या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. टोनी कक्करचं 'तेरा सूट टाइट' हे गाणं सोशल मीडियावर खूप गाजतंय. इन्स्टाग्राम अनेक नेटकरी या गाण्यावर 'इन्स्टा रिल' शूट करून पोस्ट करत असतात. 

रिअॅलिटी शोमध्ये काम करणार नसल्याचा घेतला निर्णय
नेहा सध्या 'इंडियन आयडॉल १२' या रिअॅरिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. याच कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या प्रोमोमध्ये नेहाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये झळकणार नसल्याचं ती या व्हिडीओत म्हणते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com