Neha Kakkar Divorce: प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर घेणार घटस्फोट? स्वत:च व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं सत्य

Neha Kakkar Divorce
Neha Kakkar DivorceEsakal

Neha Kakkar Divorce: म्युझिक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आणि तितकच लोकप्रिय नाव म्हणजे नेहा कक्कर. गेल्या काही दिवसांपासून नेहा ही तिच्या वयक्तिक आयुष्यामूळे चर्चेत आहे. नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्यात काही बिनसलं असल्याची चर्चा मनोरंजन विश्वात सुरु आहे.

या चर्चांना उधाण तेव्हा आलं जेव्हा नेहानं तिचा वाढदिवस साजरा केला होता , तेव्हा तिचे कुटुंब आणि मित्र या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. मात्र तिचा नवरा रोहनप्रीत कुठे दिसत नव्हता, तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या गेल्या.

नेहा आणि रोहनप्रीतमध्ये काही मतभेद सुरू आहेत आणि हे कपल लवकरच घटस्फोट घेईल अशा चर्चा सुरु झाल्या. त्यावेळी नेहानं या विषयावर बोलणं टाळलं होत.

Neha Kakkar Divorce
Adipurush: हे तर रामायणाचे विडंबन, आदिपुरुष विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

मात्र आता नेहाने असं काही केलं आहे की त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे. नेहा ने तिच्या सोशल मीडियावर पती रोहनप्रीतसोबतचे फोटो शेअर केले आहेत , ज्यात ती रोहनप्रीतच्या गालावर किस करताना दिसत आहे.

Neha Kakkar Divorce
Adipurush Box Office Collection: सडकून टीका.. तरीही दणकून कमाई! आकडा पाहून डोळे फिरतील..

कॅप्शनमध्ये तिने तिच्या अप्रतिम प्रवासाबद्दल सांगितले जिथे ती अलीकडे गेली होती. या फोटोत नेहाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि रोहनप्रीत पांढरा शर्ट आणि पांढरा पगडी घातलेला दिसत आहे.

Neha Kakkar Divorce
Kangana on Adipurush: रामाला बदनाम करू नका रे, कंगनाने आदिपुरुष सिनेमावर साधला निशाणा

तिने ही पोस्ट शेयर करताच सोशल मिडियावर हे फोटो व्हायरल झाले आहे. नेटकरी दोघांच अभिनंदनही करत आहे. तर चाहते तिने याबद्दल स्पष्टच सांगितलं म्हणुन तिच कौतुकही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही पोस्ट केलेत देवाचे आभार की तू हे पोस्ट केलेस लोकांना वाटत होते की तुम्ही घटस्फोट घेतला आहे', तर काहींनी रोहनलाच प्रश्न विचारले आहेत. की तो इतके दिवस कुठे होता.

 नेहाने 24 ऑक्टोबर 2020 रोजी पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले आहे. रोहन नेहापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com