Falguni Pathak-Neha Kakkar शीतयुद्धात चहलच्या बायकोने टाकली ठिणगी....

म्हणाली,"रिमिक्स व्हर्जन मूळ गाण्यापेक्षा चांगलेच"
Falguni Pathak-Neha Kakkar Cold War
Falguni Pathak-Neha Kakkar Cold War esakal

Falguni Pathak-Neha Kakkar Cold War: 'मैने पायल है छनकाई' गाण्याचं रीमिक्स केल्यामुळे नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक यांच्यात जोरदार वादविवाद झाला.दोघींनी एकमेकांवर टिकास्त्र सोडले.यात रीमिक्सच्या नादात नेहानं हिट गाण्याची वाट लावली असं म्हणत फाल्गुनीच्या चहात्यांनी नेहाला जोरदार ट्रोलही केल.जर कायदेशीर कारवाई करू शकत असली असती तर केली असती. पण अधिकार नसल्याच फाल्गुनी पाठक यांनी सांगितलं होत.

त्यातच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला ज्यामुळे हा वाद मिटला असं वाटलं. सोनी टी.व्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवर इंडियन आयडॉल १३ या शोच्या शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत नेहा कक्कर फाल्गुनी पाठकचं इंडियन आयडॉल १३ च्या मंचावर स्वागत करताना दिसली.त्यामूळे वाद खरच मिटला असावा हे वाटत असतांना कोरिओग्राफरआणि युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्मा हिने प्रतिक्रिया दिलीय.

नेहा कक्करने गायलेल्या या रिमिक्स गाण्यात तिच्यासह धनश्री वर्मा, प्रियांक शर्मा आहेत.यावादावर धनश्री म्हणाली की तनिष्क आणि नेहाने गाण्याला न्याय दिलाय.हे गाण ऐकतच आपण मोठे झालो.त्या गाण्यचे रिमिक्स होणार असल्याच समजल तेव्हा आम्ही उत्साहित होतो. रिमिक्स व्हर्जन सर्वाना आवडेल.अशी अपेक्षा होती. संगीतकार तनिष्क बागची, नेहा आणि जानी यांनी जुन्या गाण्यापेक्षा आणखीच छान बनवले असल्याचे तिने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com