नील नितिन मुकेश पहिल्यांदा पोलिसाच्या भूमिकेत; 'दशहरा'चा ट्रेलर रिलीज

Neil Nitin Mukeshs Dassehra movie trailer release
Neil Nitin Mukeshs Dassehra movie trailer release

मुंबई : अभिनेता नील नितिन मुकेश बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड पासून दूर आहे. पण लवकरच 'दशहरा' सिनेमातून तो दमदार पुनरागमन करणार आहे. 'दशहरा'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात नीलने पोलिसाची भूमिका साकारली आहे. समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टीतील लढा सिनेमात दाखविण्यात येईल अस तुर्तास ट्रेलर बघितल्यावर तरी कळते. 

आपल्या 11 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत नीलने पहिल्यांदा पोलिसाची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे, मुलींच्या एका वसतीगृहात तीन मुली आणि एक वॉर्डन एकाचवेळी आत्महत्या करतात. तेथे पोलिस पोहोचते. आत्महत्येमागे काही ठोस कारण नाही हे पोलिस तपासात सिद्ध होतं. तेव्हा या आत्महत्या नसून हत्या आहे हे पोलिसांना उमगतं. या हत्या का झाल्यात? या प्रश्नाचा शोध घेत सिनेमाची कथा पुढे सरकते. 

नील शिवाय 'टेबल नंबर 21' फेम अभिनेत्री टिना देसाई आणि गोविंद नामदेव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मनीष वात्सल्य यांनी 'दशहरा'चे दिग्दर्शन केले आहे. सौरभ चौधरी यांनी सिनेमाची कथा लिहीली आहे. रश प्रोडक्शन बॅनर अंतर्गत अपर्णा एस. हाउसिंग यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमा 26 ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com