Netflixच्या युजर्ससाठी खुशखबर! आता सबस्क्रिप्शन मिळेल कमी किंमतीत

बेसिक, स्टँडर्ड आणि प्रिमिअम प्लॅनच्या किंमतीत केली कपात
netflix
netflixnetflix

'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतीय युजर्ससाठी त्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन्सची किंमत कमी केली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar), अ‍ॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडून वाढती स्पर्धा पाहता नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. या स्पर्धेत आपले युजर्स वाढवण्यासाठी किंवा गमावलेले युजर्स पुन्हा मिळवण्यासाठी नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनची किंमत कमी केली आहे. नेटफ्लिक्सने मोबाइल प्लॅनची किंमत दरमहा १९९ रुपयांवरून १४९ रुपये केली आहे.

नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन

आधी - दरमहा १९९ रुपये

आता- दरमहा १४९ रुपये

नेटफ्लिक्सचा स्टँडर्ड प्लॅन

आधी- दरमहा ६४९ रुपये

आता- दरमहा ४९९ रुपये

नेटफ्लिक्सचा प्रिमिअम प्लॅन

आधी- दरमहा ७९९ रुपये

आता- दरमहा ६४९ रुपये

netflix
आई कुठे काय करते: नवीन वर्षाच्या पार्टीत संजनाची ठसकेबाज लावणी

नेटफ्लिक्सला अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून तगडी टक्कर मिळतेय. अ‍ॅमेझॉन प्राइमचा दर महिन्याचा प्लॅन १२९ रुपयांपासून सुरू होतो. तर डिस्ने प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मोबाइलसाठी वार्षिक ४९९ रुपये इतकं आहे. तर प्रिमिअम सर्व्हिसेससाठी वार्षिक १४९९ रुपये इतका आहे.

नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं, "गेल्या तीन आठवड्यांपासून आम्ही बरेच मोठे चित्रपट, वेब सीरिज नेटफ्लिक्सवर आणत आहोत. हा अशा प्रकारचा कंटेट हा मोठ्या प्रेक्षकवर्गासाठी तयार केला जातोय. त्यामुळे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेण्यासाठी किंमतीत कपात करण्याची हीच वेळ योग्य आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com