
कोटयवधींना गंडा घालणाऱ्या मुलीवर सीरिज, नेटफ्लिक्सकडून लाखो डॉलर
NetFlix: नेटफ्लिक्स सध्याच्या घडीला ओटीटीवर (OTT) सर्वाधिक लोकप्रिय असणाऱा प्लॅटफॉर्म आहे. त्याची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. कोरोनाच्या काळात नेटफ्लिक्सनं मोठ्य़ा प्रमाणावर कंटेट प्रसारित केला होता. भारतातून देखील त्यांना असंख्य ग्राहक मिळाले (Entertainment News) आहेत. नेटफ्लिक्सच्या सीईओ यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये आगामी काळात भारतात आणखी लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मालिका आणि चित्रपटांची मांडणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आता नेटफ्लिक्स एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. (social media news)
अन्ना डेल्वी उर्फ अन्ना सोरोकिन नावाच्या एका मुलीवर नेटफ्लिक्स चित्रपट निर्मिती करणार असून त्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. तिला त्यांनी तब्बल तीन लाख डॉलर्सची मदत नेटफ्लिक्सच्या वतीनं करण्यात आली आहे. आगामी काळात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अन्ना डेल्वी ही कुख्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचे कारण तिनं अनेकांना गंडवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरुन तिच्यावर कोर्टात खटलाही सुरु होता. अतिशय गरिबीत बालपण गेलेल्या अन्ना डेल्वीची संघर्षगाथा नेटफ्लिक्सच्या टीमला आवडली. त्यांनी तिला यावर चित्रपट तयार करण्याची विनंती करत त्याकामी मदत करण्याचे आश्वासनही दिले होते.
हेही वाचा: Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके
डेल्वीकडे जेव्हा काहीच पैसे नव्हते तेव्हा ती कोटींची मालकीण आहे यासाठी बँकांना पटवून द्यावे लागले होते. नेटफ्लिक्सनं जेव्हा डेल्वीची कथा ऐकली तेव्हा त्यांना ही स्टोरी क्राईम थ्रिलरपेक्षाही भयंकर वाटली. तेव्हापासून त्यांनी यावर चित्रपट निर्मिती करायची असा निश्चय केला. पत्रकार जेसिकाने अॅना सोरोकिनची कथा शोधायला सुरुवात केली. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि शेकडो मुलाखतीनंतर, न्यूयॉर्क मॅगझिनमध्ये ही कथा दिसली - "हाउ अन्ना डेल्वी ट्रिक्ड न्यूयॉर्क पार्टी पीपल" नेटफ्लिक्सची सिरीज 'इनव्हेंटिंग' ही अॅनाच्या कथेवर आधारित आहे. अॅनाच्या जीवनावरती सिरीज बनवण्यासाठी नेटफ्लिक्सने तिला तीन लाख २० हजार डॉलर्स दिले,
हेही वाचा: Video Viral: आज्जींने पहिल्यांदाच खाल्ला 'Pasta'; पाहा तिची Reaction
Web Title: Netflix Inventing Anna Movie Social Media Viral Real Story
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..