गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून.. निवेदिता सराफ झाल्या भावुक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashok saraf and nivedita saraf

गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून.. निवेदिता सराफ झाल्या भावुक..

अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, किशोरी शहाणे अशा काही दिग्गज कलाकारांनी मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवला. त्यांचे चित्रपट आजही आपण आवडीने पाहतो. 'बनवाबनवी' हा तर कित्येक पिढ्यांचा आवडता चित्रपट आहे.त्या काळातील अनेक चित्रपटांपासून एकत्र काम केलेली जोडी म्हणजे अशोक सराफ (ashok saraf) आणि निवेदिता सराफ (nivedita saraf). त्यांच्या प्रेमाचे किस्से अनेकदा आपण ऐकलेच आहे. हि जोडी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि आदर्श जोडी मानली जाते.

हेही वाचा: Filmfare Marathi : फिल्मफेअरमध्ये 'धुरळा'.. सर्वाधिक पुरस्काराचा मानकरी

आज याच जोडीची चर्चा अधिक होत आहे. आपण आपल्या जोडीदाराविषयी अनेकदा भावुक होत असतो. आपल्या भावना व्यक्त करत असतो. असाच एक भावुक क्षण निवेदिता सराफ यांच्या आयुष्यात आलेला दिसत आहे. आज चक्क त्यांनी अशोक मामांविषयी काही भावनिक शब्द लिहीत फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

हेही वाचा: चंद्रमुखीच्या तेजाने filmfare magazin लखाखतंय.. अमृता ठरली पहिली मराठी अभिनेत्री..

निवेदित सराफ यांनी अशोक सराफ सांच्यासोबत एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. शिवाय या फोटोला सुंदर आणि तितकेच भावनिक कॅप्शन दिले आहे. 'गेल्या जन्मी काही तरी पुण्य केलं होतं नक्कीच म्हणून तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं भाग्य उजळल,' असे निवेदिता सराफ यांनी लिहिले आहे. तसेच 'प्रेमा काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला' असेही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हंटले आहे.

हे लिहिण्याचे नेमके कारण पुढे आले नसले तरी 'भाग्य दिले तू मला' (bhagya dile tu mala) अशी नवी मालिका कलर्स मराठीवर (colors marathi) येणार आहे. या मालिकेत निवेदिता सराफ महत्वाच्या भूमिकेत आहेत. नुकताच या मालिका प्रोमो रिलीज झाला आहे. सध्या निवेदिता सराफ मालिका विश्वात सातत्याने कार्यरत आहेत. झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’, 'अग्गंबाई सुनबाई' या मालिकांमधील निवेदिता सराफ यांची भूमिका विशेष गाजली होती. याशिवाय निवेदिता सराफ उत्तम सुगरण असल्याने त्या स्वतःच्या युट्युब वाहिनीवरून चाहत्यांना वेगवगेळे पदार्थ तयार करून दाखवत असतात.

Web Title: Nivedita Saraf Posted A Photo With Ashok Saraf On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..