"सलमान नको, मांजरेकरांनाच हिंदी बिग बॉसचं होस्ट करा" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan and Mahesh Manjrekar

"सलमान नको, मांजरेकरांनाच हिंदी बिग बॉसचं होस्ट करा"

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss 15 बिग बॉस १५ या रिअॅलिटी शोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर Mahesh Manjrekar यांनी हजेरी लावली होती. महेश मांजरेकर हे सध्या 'बिग बॉस मराठी ३'चं सूत्रसंचालन करत आहेत. मराठीसोबतच आता हिंदी बिग बॉसचे प्रेक्षकसुद्धा त्यांच्या सूत्रसंचालनावर फिदा झाले आहेत. या एपिसोडमध्ये मांजरेकर यांनी हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या काही स्पर्धकांबाबत आपलं मतदेखील मांडलं. 'उत्कृष्ट आणि पक्षपात न करणारा सूत्रसंचालक' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. काहींनी तर मांजरेकर यांनाच सलमान खानच्या Salman Khan जागी बिग बॉस १५चा सूत्रसंचालक बनवण्याची मागणी केली.

'कालच्या एपिसोडमधील सर्वांत चांगला भाग, जेव्हा त्यांनी घरातील स्पर्धकांबद्दल स्पष्टपणे मतं मांडली', असं एका नेटकऱ्याने लिहिलं. सूत्रसंचालकाने कसं असावं हे मांजरेकरांनी दाखवून दिलं, असंही दुसऱ्या युजरने म्हटलं. आणखी एका युजरने निर्मात्यांना टॅग करत सलमान खानच्या जागी महेश मांजरेकर यांना शोचं सूत्रसंचालक बनवण्याची विनंती केली.

हेही वाचा: TRP यादीत 'ही' मालिका अग्रस्थानी; 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

सलमानपेक्षा महेश मांजरेकर हे उत्तम सूत्रसंचालन करतात, असं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं. 'मांजरेकरांनी स्पर्धकांना आरसा दाखवला आणि त्यांनी मांडलेल्या मतांशी मी सहमत आहे. सलमानला त्याची स्क्रिप्ट तयार मिळते आणि तो ते वाचतो', अशा शब्दांत एका नेटकऱ्याने 'भाईजान'ला टोला लगावला.

loading image
go to top