'कौन बनेगा करोडपती'मध्ये आता व्हिडिओ अ फ्रेंडचा पर्याय

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीचा प्रत्येक सीझन गाजला. दर सीझनमध्ये प्रेक्षकांना खेचून घेण्यासाठी नवनव्या आयडीया लढवल्या गेल्या. कघी ही रक्कम वाढवली गेली तर कधी नवे पर्याय अवलंबले गेले. आता आगामी नवव्या सीझनची तयारी सुरू झाली आहे, या सीझनमध्ये फोन अ फ्रेंड या पर्यायाएेवजी आता व्हिडिओ अ फ्रेंड हा पर्याय असणार आहे. 

याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, पण करोडपतीच्या नव्या डिझाईनमध्ये या पर्यायाचा समावेश करण्यात आल्याची माहीती सूत्रानी दिली आहे. बदलत्या तंत्रतज्ञानाचा वापर करत आता बिग बी लाईफलाईनमधल्या स्पर्धकाच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी थेट संवाद साधू शकणार आहेत. यामुळे या शोमध्ये रंगत येईल असा विश्वास या टीममधल्या प्रत्येकाला वाटतो. 

Web Title: new life line in kaun banega karodpati esakal news