esakal | जय भवानी जय शिवाजी! 'हा' अभिनेता झळकणार शिवा काशिद यांच्या भूमिकेत
sakal

बोलून बातमी शोधा

'हा' अभिनेता झळकणार शिवा काशिद यांच्या भूमिकेत

'हा' अभिनेता झळकणार शिवा काशिद यांच्या भूमिकेत

sakal_logo
By
शर्वरी जोशी

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरीदेखील प्रत्येकाचं उर अभिमानाने भरुन येतं. रयतेचा राजा म्हणून आज संपूर्ण जगात छ. शिवाजी महाराज ओळखले जातात. केवळ महाराष्ट्र किंवा देशातच नाही तर सगळ्या जगात महाराजांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामुळेच महाराजांचा इतिहास, त्यांचं शैर्य अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून उलगडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळात महाराजांसोबतच त्यांच्या काही मावळ्यांवर आधारितही चित्रपट, मालिकांची निर्मिती होऊ लागली आहे. त्यातच आता 'जय भवानी जय शिवाजी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही खास शिलेदारांची कथा उलगडली जाणार आहे. (new-marathi-tv-show-jay-bhavani-jay-shivaji-actor-vishal-nikam-play-shiva-kashid-role-first-look-out-ssj-93)

काही दिवसांपूर्वीच 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि नेताजी पालकर या भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला. त्यानंतर आता शिवा काशिद यांच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचं पान अशी ओळख असलेल्या शिवा काशिद ही भूमिका अभिनेता विशाल निकम साकारणार आहे. शिवा काशिद हे हुबेहूब महाराजांप्रमाणे दिसायचे त्यामुळे पन्हाळ गडावरुन महाराजांची सुटका करण्यासाठी शिवा काशिदने महाराजांचं सोंग घेतलं होतं असं म्हटलं जातं.

हेही वाचा: नोटीस पीरिअडमध्ये 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका!

"या संधीसाठी मी खूपच आभारी आहे. यापूर्वी मी 'साता जल्माच्या गाठी' आणि 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकांमध्ये काम केलं. या दोन्ही मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आता 'जय भवानी जय शिवाजी'मध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे. स्वराज्य हे एकचं स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय, असं म्हटलं तरी चालेल. शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे", असं विशाल म्हणाला.

दरम्यान, या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेताजी पालकरांची भुमिका कश्यप परुळेकर हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ही मालिका येत्या २६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image