अभिनेत्रीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या |keral crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor dileep
अभिनेत्रीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

अभिनेत्रीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

केरळ : एका अभिनेत्रीच्या अपहरण आणि लैंगिक शोषण (Malayalam Actress) प्रकरणातील (abduction case) अभिनेते दिलीप यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिलीप यांच्यासह पाच जणांवर केरळ गुन्हे शाखेनं (keral crime branch) नवा गुन्हा दाखल केला आहे. २०१७ मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना तपास यंत्रणेला धमकी दिल्याने दिलीप यांच्याविरोधात तक्रार दाखल ( FIR on actor Dileep and five others) करण्यात आलीय. दिग्दर्शक बालाचंद्र कुमार यांनी खळबळजनक खुलासा केल्याने दाक्षिणात्य अभिनेते दिलीप यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली. त्यामुळं या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (New police complaint filed against actor Dileep and five others in actress abduction and sexual assault case)

हेही वाचा: मुंबई : ४८ तासात दोन पोलीसांचा कोरोनामुळं मृत्यू; ५२३ जणांना संसर्ग

कुमार यांनी एक धक्कदायक खुलासा केल्यानंतर अनेक ऑडियो क्लीप्स समोर आल्या. दिलीप आणि त्यांचे सहकारी तपास अधिकाऱ्यांना धमकावत होते. अशी माहिती या ऑडियो क्लीपच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्यामुळं दिलीप आणि त्यांच्या अन्य पाच सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच दिलीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांचा जीव धोक्यात टाकण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप कुमार यांनी दिलेल्या जबाबात करण्यात आला आहे.

२०१७ मध्ये अभिनेत्रीच्या अपहरण आणि लैंगिक शोषणाच्या घटनेमुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. तसंच दिलीप यांना अनेक आठवडे न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. पाच वर्षांपूर्वी हे प्रकरण घडलं. गेल्या ५ जानेवारीला केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि या प्रकरणात आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KeralaCrime Newsactress
loading image
go to top