'पॅडमॅन' आणि 'अक्सर 2' ची पोस्टर्स झाली व्हायरल

टीम ई सकाळ
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई : बहुचर्चित पॅडमॅन आणि अक्सर भाग 2 या चित्रपटांची पहिली पोस्टर्स आज आॅनलाईन विश्वात व्हायरल झाली. पॅडमॅनमध्ये अक्षयकुमारची मुख्य भूमिका असून, ट्विंकल खन्नाने हा चित्रपट प्रोड्युस केला आहे. तर अक्सरच्या दुसऱ्या भागात झरीन खान मुख्य भूमिकेत आहे. 

या दोन पोस्टर्सची सध्या सिनेविश्वात चर्चा आहे. पॅडमॅनच्या पोस्टरमध्ये अक्षयकुमार एका सायकलवरून येताना दिसतो. या पोस्टरमध्ये बाकी काहीही नमूद केलेले नसून हा चित्रपट पुढच्या वर्षी 13 एप्रिलला येणार आहे. अक्षयसोबत या चित्रपटात सोनम कपूर आणि राधिका आपटेही आहे. तर एका खास भूमिकेत अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. तर अक्सर पार्ट 2 मध्ये मात्र सर्व माहीती पुरवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले असून, एका ट्रॅपभवती हा चित्रपट फिरतो. 

Web Title: new posters Aksar2 and Padman esakal news