बॉलिवूडमध्ये एका नवीन सिंगरचं आगमन ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम' चित्रपटातील राजेश खन्नाच्या तोंडी असलेला संवाद अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. काहींना तर त्याची एवढी भुरळ आहे की, त्यांनी हेच नाव चित्रपटाच्या शीर्षकाला दिले. Films @ 50 च्या बॅनरखाली एक नवीन चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स'. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त एका गाण्याच्या रेकॉर्डिंगने संपन्न झाला. नावातच खासियत असलेल्या या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे ते गाणं गायलं आहे छोट्या पडद्यावरील विनोदाचा अनभिषिक्त सम्राट कृष्णा अभिषेक याने. हे गाणं रोमँटिक ड्युएट असून कृष्णाला साथ दिली आहे गायिका ममता सोनी हिने.

निर्माते अमूल्य दास या चित्रपटाची निर्मिती करीत असून दिग्दर्शनाची धुरा वाहताहेत कपूर दिनकर. दिनकर यांनी या आधी प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान सोबत अनेक वर्ष सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत रतन मणी आणि पटकथा व संवादलेखन केलंय आदेश के अर्जुन यांनी. छायाचित्रणाची जबाबदारी पेलताहेत आशुतोष पांडा तर गीतकार आहेत कुमार जुनेजा व मॅक. तसेच कलादिग्दर्शक देव असून लाईन प्रोड्युसर आहेत राजा स्वान तथा जेपी व चित्रपटाच्या प्रचाराची बाजू राजू कारिया सांभाळत आहेत. 

सुपरस्टार गोविंदाचा भाचा असलेला कृष्णा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे हसवत मनोरंजन करीत असतोच पण त्याने हिंदी व भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केलंय. प्रसिद्ध संगीतकार राम गुलाटी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली कृष्णा अभिषेकने लिलया गाण्याचं रेकॉर्डिंग केलं आणि उपस्थित पत्रकारांशी गप्पा मारल्या.

'तुम्ही अभिनयाला बाजूला सारून गाण्यावर लक्ष केंद्रित करणार आहात का?' या प्रश्नाला हसून उत्तर देत तो म्हणाला ' असं काही नाही. मला लहानपणापासूनच अभिनय आणि गाण्याचा शौक होता. माझे आजोबा, म्हणजे माझे मामा गोविंदा यांचे वडील, पन्नासच्या दशकात अभिनयक्षेत्रात उतरले होते. 'मदर इंडिया' चे दिग्दर्शक मेहबूब खान यांनी त्यांना 'औरत' मध्ये नायकाची भूमिका दिली. माझी आजी अप्रतिम शास्त्रीय संगीत गायिका होती. गोविंदा मामा उत्कृष्ट अभिनेते आणि सिंगर आहेत. त्यांचे भाऊ कीर्तिकुमार उत्तम दिग्दर्शक व नट आहेत. थोडक्यात अभिनय आणि संगीत माझ्या रक्तातच आहे. त्यामुळे जेव्हा हे गाणं गाण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवण्यात आला तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.' तो पुढे म्हणाला की 'प्रोफेशनली गाण्याचं माझं लहानपणीपासूनचं स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद आहे. महत्वाचं म्हणजे हे गाणं माझ्यावरच चित्रित होणार आहे.'

अभिनय की गाणी करणार हे विचारल्यावर तो म्हणाला की 'अभिनय सफर सुरूच राहणार असून संधी मिळाल्यावर गाणारही आहे'. चित्रपटातील नवकलाकारांबद्दल विचारले असता कृष्णा उत्तराला 'प्रत्येक कलाकार कधी ना कधी नवकलाकार असतो. त्याच्यावर कोणीतरी विश्वास टाकतो, मग तो मोठा बनतो. दिग्दर्शक कपूर दिनकर यांनी मला कथा ऐकवली तेव्हा ती मला खूपच भावली त्यामुळे इतर कलाकार नवीन असले तरी सशक्त कथानकामुळे त्यांचं नवखेपण जाणवणार नाही'. 

'ओ पुष्पा आय हेट टीयर्स या चित्रपटात कृष्णा अभिषेक बरोबर नवतारका आध्या ठाकूर असून दाक्षिणात्य अभिनेता कार्तिक जयराम देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल.

Web Title: new singer enters in Bollywood