esakal |  'ज्योतिबाचा चुकीचा इतिहास दाखवला जाणार नाही',मालिकेच्या वादावर तोडगा
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh kothare and dakhancha raja jyotiba

मराठीतील प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’च्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेवरुन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादाला सुरुवात झाली होती.

 'ज्योतिबाचा चुकीचा इतिहास दाखवला जाणार नाही',मालिकेच्या वादावर तोडगा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वादाच्या भोव-यात सापडलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’आता त्या वादातून बाहेर पडताना दिसत आहे. या मालिकेसंदर्भातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे.मुंबईत या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

मराठीतील प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’च्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादाला सुरुवात झाली होती. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. मालिका ही पौराणिक व केदार विजय ग्रंथ यानुसार असावी अशी त्यांची मागणी होती. यासाठी गावकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्याकडे निवेदन दिले. 

‘ KBC मध्ये 1 कोटी जिंकले, मॅगी पाकिटात 2 मसाला पाऊच मिळाले'

या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी राजगड मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीच्या चर्चेअंती महेश कोठारे यांनी गावकऱ्यांच्या भावना समजून घेत, त्यांना ग्वाही दिली की, “ज्योतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही, तसेच भविष्यात जे काही वाहिनीवर दाखवले जाईल त्याच्यात कोणतेही आक्षेपार्ह ऐतिहासिक चित्रण नसेल.” असे सांगण्यात आले.

हे ही वाचा: कपिल शर्माने 'या' कारणासाठी केलं 11 किलो वजन कमी, 'बिहाईंड द सीन्स' व्हिडिओमध्ये झाला खुलासा

मालिकेच्या चित्रीकरणाला कोणताही विरोध गावाकडून केला जाणार नाही आणि शूटिंग व्यवस्थित पार पडेल असे आश्वासन महेश कोठारे यांने दिले आहे.

सलमान खानचा ड्रायव्हर आणि दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण, सलमानने स्वतःला केलं आयसोलेट

अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ने 23 ऑक्टोबरपासून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता.  
 

loading image