esakal | आली रे आली, सनी लिओनी आली ; मराठी गाण्यावर डान्स व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

New song of sunny Leonie video viral movie the battle of Bhima koregoan

 मराठी गाण्यावर सनीनं केलेला डान्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. इंस्टावर सनीनं आली रे आली मराठी मुलगी आली असे म्हणून आपल्या गाण्याचा व्हिडिओ शेयर केला आहे.

आली रे आली, सनी लिओनी आली ; मराठी गाण्यावर डान्स व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री सनी लिओनी हिंदी पाठोपाठ आता मराठीतही आली आहे. तिचं मराठीतील एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे लाईक्स मिळाले आहेत. मराठी गाण्यावर सनीनं केलेला डान्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. इंस्टावर सनीनं आली रे आली मराठी मुलगी आली असे म्हणून आपल्या गाण्याचा व्हिडिओ शेयर केला आहे.

सनी बॉलीवूडमध्ये येणार तिथं हिट येणार हे त्यावेळी कुणाला सांगितले असते तर खरे वाटले नसते. त्यानंतर ती मराठीतही आपला जलवा दाखविणार हे ऐकून नवल वाटले असते. आता ते खरे झाले आहे. हिंदी चित्रपटातून तर तिनं कधीच इंट्री केली आहे. आता मराठीतल्या 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव' या चित्रपटात ती एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारा चेहरा म्हणूनही सनीची वेगळी ओळख आहे. मराठी मुलगी वेगळ्या लुक्स मध्ये दिसून येणार असल्याची टिप्पणी तिनं केली आहे.

सनीवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं प्रसिध्द गायिका श्रेया घोषाल हिनं गायलं आहे. या गाण्यात सनी कमालीची सुंदर दिसत आहे. त्यात तिनं केलेला डान्सही भारी आहे. त्याला चाहत्यांनी लाईक्स दिले आहेत. हे गाणं सोशल मीडियावर शेयर करताना सनीनं 'आली रे आली मराठी मुलगी आली' या शब्दांत पोस्ट केली आहे. काही तासांपूर्वी शेयर केलेल्या या गाण्याला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. आणि सनीच्या डान्सचे कौतूक केले आहे. 

loading image