'लव्ह लग्न लोचा'ची टीम होणार बेघर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

यातील राघव, सौम्या, अभिमान, सुमीत, विनय, काव्या, आकांक्षा आणि खळखळून हसणारी शाल्मली ही मित्रमंडळी आज सगळ्यांच्या जवळची झाली आहेत. आज मैत्रीच्या मालिकांमध्ये 'लव्ह लग्न लोचा' सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. पण या मालिकेमध्ये एक मोठा 'लोचा' होणार आहे.

लव्ह लग्न लोचा ..

ज्या मालिकेच्या नावातच 'लोचा' आहे, तिथे लोचे होणे हि काही नवीन गोष्ट नाही. मैत्रीतलं प्रेम, लग्नातील मज्जा आणि या सगळ्यांतून होणारे लोचे हे आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग आहे. झी युवावरच्या 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत असल्याने ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने बच्चे पार्टीपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपलेसे केले आहे.

मैत्रीचे वेगेवेगळे रंग दाखवणारी ही मालिका सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि गावात आवडीने पहिली जात आहे. यातील राघव, सौम्या, अभिमान, सुमीत, विनय, काव्या, आकांक्षा आणि खळखळून हसणारी शाल्मली ही मित्रमंडळी आज सगळ्यांच्या जवळची झाली आहेत. आज मैत्रीच्या मालिकांमध्ये 'लव्ह लग्न लोचा' सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. पण या मालिकेमध्ये एक मोठा 'लोचा' होणार आहे. या टीमलाच आता बेघर व्हावे लागणार आहे. मालिकेतील विनय, राघव आणि सुमीत यांना त्यांचं घर सोडावं लागणार आहे. त्याच काय झालंय विनय, राघव आणि सुमीत हे गेली अनेक वर्षे माने कुटुंबियांच्या फ्लॅट मध्ये 'पेइंग गेस्ट' म्हणून राहतात हे आपल्याला माहीतच आहे. माने कुटुंब सुद्धा त्यांना अगदी मुलासारखे सांभाळतात प्रेम करतात. पण याच गोष्टीचा माने कुटुंबियांच्या खऱ्या मुलाला त्रास झाला. एक तर तो अनेक वर्षे अमेरिकेत होता, स्वभावानेच अहंकारी, तिरकस असलेला श्रीकांत म्हणजेच आपला समीर खांडेकर. आता श्रीकांत तिरस्काराने पेटला आहे. त्यामुळे माने काकूंना तो पटवून देणार आहे की हि आपली विनय, सुमीत आणि राघव ची गॅंग कशी चुकीची आहे. आता त्यांना तो घराबाहेर काढणार आहे. पण त्यानंतर काय? श्रीकांत खरंच असे करू शकेल? आपले विनय, सुमीत राघव कुठे जाणार? चांगल्या विरुद्ध वाईट एकमेकांच्या समोर टिकतील का?  

या 'लोच्या'चं नक्की काय होते हे पाहण्यासाठी पहात राहा 'लव्ह लग्न लोचा' झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता. 

Web Title: new twist in TV serial Love Lagn Locha

टॅग्स