'व्हाटसअपचे नवीन 'दिवाळी स्टिकर' एक नंबर': कसे डाऊनलोड कराल?

New whats up diwali sticker download form play store and share
New whats up diwali sticker download form play store and share

मुंबई - दिवाळी म्हटलं की आनंदाची पर्वणी, सगळीकडे प्रकाशाची उधळण, खरेदीची लगबग, फराळाची मेजवानी हे सारे सुरु असते. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. अशावेळी भेटवस्तुंवर आकर्षक सवलती सुरु असते. अनेकजण त्याचा लाभ घेताना दिसून येतात. काहीजण दिवाळीच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देण्यात बिझी झालेले असतात.

आता व्हाटसअप ने दिवाळीच्या मेसेजसाठी खास स्टीकरची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ते स्टीकर प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे. दिवाळीचा सण पूर्ण देशात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी धांदल सुरु असते. मात्र यंदा या सणावर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या गावी जाणा-यांची संख्या तुलनेनं कमी आहे. कित्येकांनी कोरोनाच्या भीतीमुळे कुठेही बाहेर न जाता घरातच साजरी करायचे ठरवले आहे.

आपल्या प्रियजनांना दिवाळीचे संदेश पाठवून ही दिवाळी आणखी संस्मरणीय बनविण्यासाठी व्हाटसअपने पुढाकार घेतला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हाटसअपने आता दिवाळीचे औचित्याने नवीन अॅनिमेटेड स्टीकर युझर्सला उपलब्ध करुन दिले आहे. ते डाऊनलोड करुन आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवता येणार आहे. हे स्टीकर डाऊनलोड करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी पुढील सुचनांचे पालन करा. 
1. तुमच्या मोबाईलमध्ये असणा-या व्हाटस अप मध्ये जा.

2. ज्या ठिकाणी the person or group chat असे लिहिले आहे त्यावर क्लिक करा. ज्यांना तुम्हाला दिवाळीचे स्टीकर पाठवायचे आहेत त्यांचे नाव सिलेक्ट करा.  

3.chat bar च्या पुढे असणा-या emoji icon वर टॅप करा. 

4.  यानंतर Choose the stickers' icon and click on the '+' symbol on the right. सुचनेचे पालन करा. 

5. यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर array of stickers packs. दिसेल. त्यापैकी एक निवडा आणि त्याला डाऊनलोड करा.

6.  आता तुम्ही डाऊनलोड केलेले स्टीकर तुम्हाला तुमच्या मित्रांना पाठवता येतील.  

 *  हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील सुचनांचे पालन करा.

1. पायरी पहिली - प्ले स्टोअरवरुन  ‘Sticker Maker’ डाऊनलोड करा. 

2 . पायरी दुसरी- त्यावर हॅप्पी दिवाळीच्या नावाने जे काही स्टिकर आहेत ते डाऊनलोड करा.

3. ते स्टीकर तुमच्या व्हाटस अॅपला अॅड करुन घ्या. त्या अगोदर ते प्ले स्टोअरवरुन ओपन केल्यानंतर क्रिएट अ न्यु स्टीकर पॅक हा ऑप्शन सिलेक्ट करा.

4. त्याठिकाणी तुमचं नाव लिहा आणि स्टीकर बटण अॅड करा. तुमच्या गॅलरीतून तुम्ही डाऊनलोड केलेल्या इमेजेस अपलोड करा.

5. आता ‘Publish Sticker Pack’ वर प्रेस करा. त्यानंतर हे स्टीकर तुमच्या WhatsApp sticker library मध्ये अॅड होतील. 
 
* थर्ड पार्टी व्हाटस अप दिवाळी स्टीकर कसे पाठवाल 

1. व्हाटस ओपन केल्यावर त्यावर person or group chat सिलेक्ट करावा लागेल. त्यावर Diwali 2020  स्टीकर पाठविण्यासाठीची ही सुविधा आहे.

2. emoji icon वर क्लीक करा. chat bar वर जाऊन  '+' symbol वर टॅप करा.

3. स्क्रोल डाऊन करुन "Get more stickers" option शोधा. 

4. आता तुम्ही थेट Google Play Store or Apple's App store वर असाल. अशावेळी तुम्हाला त्यावर उपलब्ध असलेल्या list of sticker apps वापरता येतील.  that you can download
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com