'पोटरा' न्युयॉर्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अंतिम फेरीत

पोटरा चित्रपटाला आतापर्यंत पाच आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवचे पुरस्कार मिळाले
new york international film festival potra movie
new york international film festival potra movie sakal

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील रहिवासी असलेले शंकर धोत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या पोटरा या चित्रपटाला आतापर्यंत पाच आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाने संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देऊन त्यांच्या या चित्रपटावर नव्याने मोहोर उमटवली आहे.सध्या सुरु असलेल्या न्युयॉर्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अंतिम फेरीत पोहोचला आहे.

या चित्रपटाचे पटकथा लेखक व दिग्दर्शक शंकर धोतरे हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील रहिवासी आहेत. चित्रपट व्यवसायात ते मागील अऩेक वर्षापासून कार्यरत आहेत. अऩेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. ते स्वतः या चित्रपटाचे स्क्रीन प्ले व दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात शंकर धोत्रे यांनी एका वेगळ्या विषयावर कथेची मांडणी केली आहे. ज्वारीचे कणीस हे पोटर्यात येते. त्या प्रमाणे वयात येणार्या मुलीच्या मासिक पाळी आल्यावर ग्रामिण भागात या घटनेकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोन मांडला आहे. एक वेगळ्या धाटणीची कथा या चित्रपटात मांडली गेली आहे.

या चित्रपटाला सातत्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सलग पारितोषिके मिळाली आहेत. यामध्ये पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विजेता चित्रपट ठरला. त्यानंतर रोम चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पारितोषिक मिळाले. हॅली कार्निसेस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्री. धोत्रे यांना विशेष पुरस्कार देऊन गैरवण्यात आले. सिंगापूरच्या वर्ल्ड फील्म कार्निव्हल मध्ये हा चित्रपट विजेता ठरला. रशियात आयोजित केलेल्या फॉक्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये देखील विशेष पुरस्कार या चित्रपटाला मिळाला.

पुरस्काराची मालिका देशातही सुरु आहे. पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला तीन पारितोषिके मिळाली आहेत. या चित्रपटातील अभिनेत्री छकुली देवकर हिला देखील सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने देखील संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आता सुरु असलेल्या न्यूयॉर्क येथील चित्रपट महोत्सवात हा चित्रपट अंतिम फेरीत पोहोचला आहे.

पुढील काळात आता आणखी व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करण्यचे ठरवले आहे. जगभरातील चित्रपट महोत्सवांनी घेतलेली पोटरा चित्रपटाची दखल व पुरस्कारांनी नव्या निर्मितीची प्रेरणा मिळाली आहे.

- शंकर धोत्रे, दिग्दर्शक, पोटरा चित्रपट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com