esakal | सिंघम 2 फेम अभिनेता ड्रग्ज प्रकरणात अटक, शाळेतली मुलं होती ग्राहक
sakal

बोलून बातमी शोधा

सिंघम 2 फेम अभिनेता ड्रग्ज प्रकरणात अटक, शाळेतली मुलं होती ग्राहक

सिंघम 2 फेम अभिनेता ड्रग्ज प्रकरणात अटक, शाळेतली मुलं होती ग्राहक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा (bollywood) दिवंगत अभिनेता सुशांत सिंग (sushant singh rajput) राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. त्याच्या तपासाच्या वेळी वेगवेगळ्या सेलिब्रेटींची नावं उजेडात आली होती. हे प्रकरण एवढं टोकाला गेलं होतं की अखेर बॉलीवूडमधल्याच एका सेलिब्रेटीला चाहत्यांना आवाहन करावं लागलं की, आम्ही ड्रग्जच्या विळख्यात नाही. कुणा एकामुळे आम्हा सगळ्यांना दोषी धरु नका. आता बॉलीवूडमध्ये काम कऱणाऱ्या एका अभिनेत्याला ड्रग्जचा व्यापार त्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीनं करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या त्या अभिनेत्याचं नाव चेक्वामे मालविन (Chekwume Malvin) असे आहे. बंगळुरुमधून त्याला अटक करण्यात आली आहे. पथकाला मिळालेल्या एका टीपमधून त्यांनी ही कारवाई केली आहे. चेक्वामे हा नायजेरियन असून त्यानं आतारपर्यत वीसहून अधिक बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात विश्वरुपम, सिंघम, अन्ना बाँड, दिलवाले, जँम्बो सावरी, याबरोबरच प्रमाथा चित्रपटांचा समावेश आहे. नॉलीवूडमधल्या तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशा या प्रसिद्ध कलाकाराला झालेल्या अटकेनंतर बॉलीवूडमधील ड्रॅग्ज कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील काही कलाकारांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालविन हा मेडिकल व्हिसावर भारतात आला आहे. आणि तो मुंबईतील न्युयॉर्कमधील फिल्म अॅकेडमीमध्ये दोन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होता. मालविन हा कामानिमित्तानं बंगळुरुमध्ये आल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. मालविन हा सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय काही मोठया उद्योगपतींशी देखील त्याची डील झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं

हेही वाचा: De Dhakka 2: थांबायचं नाय, सिद्धार्थनं सांगितली रिलिज डेट

loading image
go to top