Nikita Ghag: अभिनेत्रीनं परत केला दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड..म्हणाली, 'हा तर'

Nikkita Ghag
Nikkita GhagEsakal

काही दिवसांपुर्वी मुंबईमध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' पार पडला.या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आलिया भट्ट, वरुण धवन, रणबीर कपुर अशा अनेक कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला.

Nikkita Ghag
Akshay Kumar: 'कुणाची लागली नजर' अक्षय कुमार ठरला फ्लॉप चित्रपटांचा बादशाह...

मात्र हा पुरस्कार शासनाकडून दिला जातो असा अनेकांचा समज आहे. मुळात तसं नसून हा पुरस्कार एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यानंतर बरेच वाद झाले.

आता त्यातच मॉडेल निकिता घाघ ही दादासाहेब फाळके यांच्या नावाप्रमाणेच असणाऱ्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड शो विरोधात बोलली आहे . गेल्या वर्षी मिळालेला पुरस्कार तिनं परत करण्याची घोषणा केली आहे. निकिता घाग इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. त्याच्या व्यक्तिरेखेनुसार तिला 2021 मध्येही हा पुरस्कार देण्यात आला होता.

एका वेबसाइटशी बोलताना निकिता घाग म्हणाली की, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी हा पुरस्कार परत करावा. हा खोटा पुरस्कार असून यामुळं खऱ्या पुरस्काराचे पावित्र त्यामुळं जपले जात नसल्याचं तिनं सांगितलं.

Nikkita Ghag
Linkedin Blocked Sunny Leone: 'तू खरी सनी लियोनी नाय' म्हणत ब्लॉक केलं अकाउंट... व्हिडिओ व्हायरल

निकिता घागने सांगितले की, भारत सरकार चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके यांच्या नावाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या रूपात करते हे माझ्यासारख्या अनेक नव्या कलाकारांना माहीत नाही. त्यामुळं या पुरस्कारासारख्या समान नावांच्या पुरस्कारावर बंदी घालण्याची मागणीही मी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तिने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com