Gargi Phule: निळू फुलेंच्या कन्या गार्गी फुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.. शरद पवार यांचे घेतले आशीर्वाद..

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश..
nilu phule daughter gargi phule join ncp  party in the presence of ajit pawar jayant patil sharad pawar
nilu phule daughter gargi phule join ncp party in the presence of ajit pawar jayant patil sharad pawarsakal

Gargi Phule joined NCP: ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी काल मंगळवार, 30 मे रोजी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील उपस्थित होते.

यावेळी अभिनेत्री सविता मालपेकर देखील उपस्थित होत्या. त्या देखील राष्ट्रवाडी पक्षात आहेत. पक्ष प्रवेशानंतर गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

या संदर्भात एक पोस्ट करत गार्गी फुले यांनी माहिती दिली आहे, सोबतच एका नव्या प्रवासाची सुरुवात करतेय.. असंही त्या पोस्ट मध्ये म्हणाल्या आहेत.

(nilu phule daughter gargi phule join ncp party in the presence of ajit pawar jayant patil sharad pawar)

nilu phule daughter gargi phule join ncp  party in the presence of ajit pawar jayant patil sharad pawar
Madhurani Prabhulkar: नवरा बायकोचं नातं कसं असावं? अरुंधतीची ही पोस्ट चुकूनही चुकवू नका..

गार्गी फुले या अभिनेत्री आहे. वडिलांची ओळख न वापरता त्यांनी जिद्दीने नाटक-सिनेमा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. गार्गी फुले यांनी पुण्यातील अभिनय विद्यालयातून शिक्षण घेतले तर मुंबई युनिव्हर्सिटी तुन MA ची पदवी प्राप्त केली आहे. १९९८ मध्ये अभिनेत्री गार्गी फुले यांनी पहिलं नाटक केलं ते एलकुंचवारांचं 'सोनाटा' आणि नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले.

झी मराठीवरील मालिका 'तुला पाहते रे' मध्ये 'ईशा'च्या आईची भूमिका साकारली होती. या आधीही झी युवा वाहिनीच्या 'कट्टी बट्टी' या मालिकेत त्या पाहायला मिळाल्या होत्या.

कलर्स मराठी वरील 'राजा राणीची ग जोडी' या मालिकेत ही त्या 'बेबी मावशी' या महत्वाच्या भूमिकेत होत्या. तर सध्या त्या 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत 'देवाच्या आई'ची भूमिका करत आहेत.

nilu phule daughter gargi phule join ncp  party in the presence of ajit pawar jayant patil sharad pawar
Singer KK Death Anniversary: 'केके'ची आज पहिली पुण्यतिथी आणि त्याचं शेवटचं मराठी गाणं रिलीज झालंय..

सप्टेंबर २००७ मध्ये गार्गी फुले यांचे लग्न झाले असून त्यांच्या पतीचे नाव ओंकार थत्ते असे आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. वडीलांप्रमाणेच त्या देखील बऱ्याच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आता सामाजिक कामासोबत त्यांची राजकीय कारकीर्द देखील सुरू झाली आहे.

या संदर्भात त्यांनी पक्ष प्रवेशाचे फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील असे ज्येष्ठ नेते दिसत आहेत. तर प्रवेशानंतर त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे देखील आशीर्वाद घेतले. सोबत ''नविन प्रवासाची सुरुवात करत आहे. आशीर्वाद असावा.. '' असे कॅप्शन ही त्यांनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com