निशिकांत कामतची हटके भूमिका 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जानेवारी 2017

"फुगे' चित्रपटात साकारलाय "खलनायक' 
मुंबई :  अभिनेता व दिग्दर्शक निशिकांत कामत "फुगे' या मराठी चित्रपटात एका हटक्‍या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. येत्या 10 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

"फुगे' चित्रपटात निशिकांत गोव्यातील एका गावातील भैरप्पा नामक गुंडाची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो जितका रागीट आहे तितकाच तो प्रेमळही आहे. "एकच फाईट आणि वातावरण टाईट' अशा धाटणीचे अनेक संवाद भैरप्पाचे असल्यामुळे निशिकांत कामतचे आगळेवेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित आणि इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस. टीव्ही नेटवर्क्‍ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बरहान, कार्तिक निशानदार तसेच अश्‍विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेल्या "फुगे' चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहरे, नीता शेट्टी, आनंद इंगळे, मोहन जोशी व सुहास जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  

Web Title: Nishikant kamat in fuge marathi movie