Nita Ambani: 59 वर्षीही इतकी उर्जा! NMACC इव्हेंटमध्ये 'रघुपती राघव राजा राम' वर नीता अंबानींचा डान्स... व्हिडिओ व्हायरल

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नीता अंबानी लाल आणि गुलाबी रंगाच्या सुंदर लेहेंगामध्ये परफॉर्म करताना दिसत आहेत.
nita ambani
nita ambaniSakal

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा सध्या चर्चेत आहे. अंबानी कुटुंबाच्या एंट्रीने चाहत्यांची मने जिंकली, तर बॉलिवूड ते हॉलिवूड स्टार्सच्या सहभागाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

पण आता या कार्यक्रमाचा एक आतला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये नीता अंबानी 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन'मध्ये खास परफॉर्मन्स देताना दिसत आहेत. हे परफॉर्मेंस सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे.

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नीता अंबानी लाल आणि गुलाबी रंगाच्या सुंदर लेहेंगामध्ये परफॉर्म करताना दिसत आहेत. यामध्ये श्रेया घोषालने गायलेले रघु पती राघव राजा राम या गाण्यावर नीता अंबानी यांचे सुंदर नृत्य चाहत्यांची मने जिंकत आहे.

nita ambani
Sharad Ponkshe: हिंदू एक होतायत.. हेच सुखावणार आहे! शरद पोंक्षे यांच्या पोस्टनं चर्चेला उधाण..

अंबानी कुटुंबाच्या या खास कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, निक जोनास आणि अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स दिसले. या व्यतिरिक्त संपूर्ण अंबानी कुटुंब या खास प्रसंगी एकत्र दिसले, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com