Oscar 2024 Nitin Desai : 'ऑस्कर' सोहळ्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली!

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली.
Nitin Desai Latest News
Nitin Desai Latest Newsesakal

Art director Nitin Desai honoured at Oscars’ In Memoriam section :

बॉलीवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना यंदाच्या ९६ व्या ऑस्कर सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ऑस्कर सारख्या जगप्रसिद्ध चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात देसाई यांना वाहण्यात आलेली आदरांजलीची चर्चा होताना दिसत आहे.

ऑस्करच्या मेमोरियन सेगमेंटमध्ये दिग्दर्शक, निर्माता आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. देसाई यांच्यासह टीना टर्नर, फ्रेंडस स्टार मॅथ्यु पेरी, कंपोझर बिल ली, अभिनेत्री चिता रिव्हेरा, अभिनेता रेयॉन ओ नेल, कॉमेडिनय रिचर्ड लेविस, अभिनेत्री ग्लेंडा जॅक्सन आणि आणखी दिवंगत अभिनेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Nitin Desai Latest News
Oscar Winner 2024 : अखेर 'ओपनहायमर'नं कोरलं 'ऑस्कर'वर नाव! 13 नॉमिनेशन, 7 पुरस्कारांवर उमटवली मोहोर

गेल्या वर्षी वयाच्या ५७ व्या वर्षी देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या या घटनेनं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. स्टुडिओवर असलेले कर्ज म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले होते. बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक म्हणून जागतिक पातळीवर देसाई यांनी त्यांच्या नावाची वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली होती.

Nitin Desai Latest News
Oscar Winner 2024 : अखेर 'ओपनहायमर'नं कोरलं 'ऑस्कर'वर नाव! 13 नॉमिनेशन, 7 पुरस्कारांवर उमटवली मोहोर

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या अनेक चित्रपटांसाठी देसाई यांनी भव्य दिव्य सेटची उभारणी केली होती. त्यात हम दिल दे चुके सनम, देवदास, रामलीला, बाजीराव मस्तानी तसचे त्यांनी विधू विनोद चोप्रा आणि आशुतोष गोवारीकर यांच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये केलेलं कला दिग्दर्शन जागतिक पातळीवर गौरविले गेले. वन्स अपॉन टाईम इन मुंबई, मुन्नाभाई एमबीबीएस, मिशन कश्मिर, जोश आणि प्यार तो होना ही था सारख्या चित्रपटांचे देसाई यांनी केलेले कलादिग्दर्शन चाहत्यांच्या कौतुकाचा विषय होता.

Nitin Desai Latest News
Oscars 2024: श्वानाची हजेरी, नग्न अवस्थेत जॉन सीना आणि अभिनेत्रीचा ड्रेस...; यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात काय-काय घडलं?

देसाई यांचा कर्जत येथे स्टुडिओ असून तिथं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. कर्जबाजारी झालेल्या देसाई यांच्या स्टुडिओवर अनेक कंपन्या जप्ती आणण्याच्या तयारीत होत्या. असेही म्हटले जात आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com