esakal | मुलाच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता सराफ यांची खास पोस्ट

बोलून बातमी शोधा

Nivedita Saraf with family
मुलाच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता सराफ यांची खास पोस्ट
sakal_logo
By
स्वाती वेमूल

'अग्गंबाई सासूबाई' आणि 'अग्गंबाई सूनबाई' या दोन्ही मालिकांमध्ये आसावरीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ या सोशल मीडियावर सक्रिय असतात. कधी मालिकेच्या सेटवरील फोटो, तर कधी स्वत: बनवलेल्या विविध पदार्थांचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. निवेदिता यांनी नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या मुलाचा वाढदिवस. मुलगा अनिकेतच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 'परफेक्ट फॅमिली फोटो' शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

निवेदिता सराफ यांची पोस्ट

'प्रिय अनिकेत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंददायी दिवस म्हणजे ज्यादिवशी तू जन्माला आलास. तू सर्वांत दयाळू आणि सर्वांत उदार व्यक्ती आहेस आणि मला तुझा खूप अभिमान आहे. तू कधीही बदलू नकोस आणि तुझ्या मूल्यांवर कायम राहा. तुला खूप प्रेम', अशा शब्दांत निवेदिता यांनी भावना व्यक्त केल्या. अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि अनिकेत.. तिघांच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. 'कुछ तो गडबड है दया'; शिवाजी साटम यांनी सांगितला डायलॉगमागचा भन्नाट किस्सा

हेही वाचा : 'कुछ तो गडबड है दया'; शिवाजी साटम यांनी सांगितला डायलॉगमागचा भन्नाट किस्सा

निवेदिता यांच्या या फोटोवर 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील त्यांची सहकलाकार तेजश्री प्रधाननेही कमेंट केली आहे. 'हॅपी बर्थडे अनिकेत' असं लिहित तेजश्रीने शुभेच्छा दिल्या आहेत. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. आई-वडिलांप्रमाणे त्याने अभिनयक्षेत्र न निवडता शेफ होण्याचं ठरवलं. त्याच्या सोशल मीडियावर तो अनेक रेसिपींचे फोटो पोस्ट करत असतो.