Noida Film City : नोएडामध्ये 'फिल्म सिटी' कोण उभारणार? अक्षय कुमार, बोनी कपूरनं लावली बोली! ३० जानेवारीला होणार निर्णय

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे नवीन फिल्म सिटी होणार अशी गेल्या वर्षांपासून चर्चा सुरु आहे. त्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घोषणा केली होती.
Noida Film City Akshay Kumar Bollywood Actor Biding
Noida Film City Akshay Kumar Bollywood Actor Biding

Noida Film City Akshay Kumar Bollywood Actor Biding : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे नवीन फिल्म सिटी होणार अशी गेल्या वर्षांपासून चर्चा सुरु आहे. त्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घोषणा केली होती. आता त्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी अक्षय कुमारनं देखील बोली लावल्याचे सांगितले जात आहे.

अक्षय कुमार सहित बोनी कपूर सह चार कंपन्यांनी फिल्म सिटीसाठी बोली लावल्याचे दिसून आले आहे. यमुना प्राधिकरणच्या सेक्टर २१ मध्ये २३० एकर परिसरात ही फिल्म सिटी तयार केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या फिल्म सिटीसाठी अक्षय कुमार, बोनी कपूर, केसी बोकाडिया यांनी बोली लावली आहे. औद्योगिक विकास आयुक्त मनोज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे.

अक्षय कुमारनं देखील या बोली प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे दिसून आले. याशिवाय फोर लायन्स फिल्म प्रा.लि. कंपनाचे केसी बोकाडिया, करिश्मा जैन, विशाल, हर्ष जैन आणि सुपर सोनिक टेक्नोबिल्ड प्रा. लि च्या वतीनं अभिनेता अक्षय कुमार यांनी सहभाग घेतला होता. अक्षयनं ऑनलाईन या प्रक्रियेत भाग घेतला होता. त्याच्या टीममधील काही सदस्य हे प्राधिकरण कार्यालयात हजर होते.

Noida Film City Akshay Kumar Bollywood Actor Biding
Mumbai Film City: मुंबई फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार? योगी आदित्यनाथ स्पष्टचं बोलले

सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या वतीनं सीईओ विनय कुमार मित्तल, शंकरन कन्नन, सुधीर शर्मा, यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. त्यांनी म्हटले की, आता पर्यंत चार कंपन्यांनी त्यांची बोली सुरु केली आहे. तीन जानेवारी रोजी प्राधिकरण कार्यालयात ती वित्तीय निविदा खुली केली जाणार आहे. त्यात सर्वाधिक बोली ज्या निर्मात्यानं लावली असेल त्याला विकासक म्हणून घोषित केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com