कोरोना योद्धयांसाठी पुढे आली नोरा फतेही.... केले हे काम

nora
nora

दिलबर दिलबर... बडा पछतावोगे... वो साकी साकी... एक तो कम जिंदगानी...कमरिया...हाय गर्मी...असे एक ना अनेक गाण्यांच्या तालावर थिरकायला लावणारी बॉलिवूडमधील सतत चर्चेत असलेली अभिनेत्री नोरा फतेही. सगळी चित्रपटसृष्टीच लॉकडाऊनमुळे सध्या निवांत आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज समाजावर कोणतेही संकट आले की समाजाप्रती आपले दायित्व पूर्ण करताना दिसतात.
सेलिब्रिटीपासून सामान्यांपर्यंत सर्वच जण या संकट काळात सामाजिक दायित्व पूर्ण करीत आहेत. कोरोनाने सामाजिक ऐक्‍यावर शिक्‍कामोर्तब केले आहे.
नोरा फतेह सध्या कोरोनामुळे मुंबईमध्ये तिच्या घरात क्‍वारंटाईन आहे. आणि इतर अनेक कलावंताप्रमाणेच सोशल मीडियावर कोरोना व्हायरसच्या संकट काळातही काम करणाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. नोराने पीपीई किट्‌सचे वाटप केले आहे आणि इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असलेली ही अभिनेत्री सर्वांचे मनोरंजन करीत असते. सोशल मीडियावर ऍक्‍टीव्ह असलेली नोरा नेहमीच चर्चेत असलेली पाहावयास मिळते. नोरा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती अभिनेत्री बनली आहे. नेहमीच सर्वांची वाहवा मिळवत असते. नोराने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. यावेळी नोरा म्हणाली की, गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सर्वजण आपआपल्या घरात सुरक्षित आहोत ते फक्त आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टर, स्वच्छता कर्मचारी यांच्यामुळेच ना, मग आपणही त्यांची काळजी घेतली पाहिजे. याक्षणी अनेक साधनांची कमतरता जाणवत आहे. त्यामध्ये पीपीई किट्‌स आवश्‍यक आहेत. म्हणून नोराने भारतातील सरकारी रुग्णालयांमध्ये पीपीई किट्‌सचे वाटप केले आहे. बाकीच्यांनीही पुढे येऊन मदत केली पाहिजे असे आवाहनही नोराने केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com