
मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फत्तेही तिचा अंदाज आणि तिच्या जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाते. नोराने अनेक बॉलीवूड सिनेमांमध्ये स्पेशल साँग्स करुन धमाल उडवलीये. सध्या सोशल साईटवर नोराचा असाच एक व्हिडिओ धमाल करतोय. तिचा हा व्हिडिओ लाखोवेळा पाहिला गेलाय. या व्हिडिओमध्ये ती 'प्रीतम प्यारे' गाण्यावर तिचा जबरदस्त अंदाज दाखवतेय.
नोरा फत्तेहीचा डान्स नंबर पाहण्यासाठी चाहते आतुरलेले असतात. तिच्या अदा, तिचे ठुमके चाहत्यांना घायाळ करतात. असाच एक डान्स व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय आणि चाहत्यांच्या पसंतीस देखील पडतोय. अक्षय कुमारच्या राऊडी राठोड सिनेमातील प्रीतम प्यारे गाण्यावर नोरा ठुमके लगावतेय. नोराच्या या व्हिडिओ सोशल साईटवर धमाल उडवलीये. यात तिच्या डान्ससोबतंच तिच्या एक्सप्रेशन देखील पाहण्यासारख्या आहेत.
नोरा फत्तेहीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या फॅनपेजच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आत्तापर्यंत लाखोंनी हा व्हिडिओ पाहिला आहे. नोराचा हा व्हिडिओ जुना असून झलक दिखला जा शोच्या सेटवरचा आहे. या शोमध्ये तिने तिच्या डान्सने सगळ्यांना वेड लावण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नव्हती. या व्हिडिओमध्ये तिच्या अप्रतिम डान्स स्टेप्स तर आहेतंच सोबतंच तिची एनर्जी आणि तिचे हावभाव कमाल आहेत. हा व्हिडिओ पाहून नोरा उत्तम डान्सर असल्याचं तिने दाखवून दिलंय. तिच्या या व्हिडिओची चाहते खूप स्तुती करत आहेत.
नोराने 'स्ट्रीट डान्सर' सिनेमात महत्वाची भूमिका साकारली होती. सिनेमातील तिच्या गरमी या गाण्याने तर रिलीज आधीच अनेक रेकॉर्ड केले होते. आता नोरा आगामी 'भुजः द प्राईड ऑफ इंडिया' या सिनेमात अजय देवगण सोबत दिसेल. नोराची 'दिलबर', 'साकी साकी', 'कमरिया' ही गाणी देखील प्रेक्षकांच्या आवडीची गाणी आहेत.
nora fatehi dance on aa re preetam pyare actress dance steps and expression wins heart
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.