esakal | दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात नोराचा 'नूर' 
sakal

बोलून बातमी शोधा

NORA1

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बोल्ड अंदाजाने आणि नृत्याने नोरा फतेहीने नेहमी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात नोराचा 'नूर' 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बोल्ड अंदाजाने आणि नृत्याने नोरा फतेहीने नेहमी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिच्या सौंदर्याने आणि कलेने ती चाहत्यांना घायाळ करते. वेगवेगळ्या म्युझिक अल्बममधून ती तिचे डान्स स्किल दाखवत असते. नोराचे 'दिलबर दिलबर' हे गाणं खूप गाजलं. त्यातील नोराच्या बेली डान्सने प्रेक्षकांचे मन जिंकले, त्यानंतर बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा विकी कौशल सोबत नोराचे 'बडा पचताओगे' हे गाणे देखील खूप गाजले. या गाण्यातील विकी आणि नोराची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. 

'हक्काचा पैसा भीक मागितल्यासारखा...'; शर्मिष्ठा राऊतचा मंदार...

नुकताच नोराला या वर्षीचा दादा साहेब फाळके पर्फोर्मर ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळाला आहे. नोरा या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी नोराने पारंपरिक लूक केला होता. पिस्ता कलरच्या साडीमध्ये नोरा अतिशय सुंदर दिसत होती. नोराने या पुरस्कारासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'या पुरस्कारासाठी मी सर्वांचे आभार मानते. माझा गौरव केल्याबद्दल या पुरस्काराच्या जुरीचे मी अभार मानते. मी माझ्या चाहत्यांचे देखील आभार मानते. हा पुरस्कार मला मनोरंजन क्षेत्रात अजून काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल' असे कॅप्शन नोराने या फोटोला दिले आहे. दादासाहेब फाळके हा पुरस्कार कलाकारांसाठी खूप मानाचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार मिळाल्याने नोराला खूप आनंद झाला आहे.