नोरा फतेहीचं #osakisakidancechallenge होतंय व्हायरल

टिम इसकाळ
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे : सध्या अभिनेत्री नोरा फतेहीचं 'बाटला हाऊस' या चित्रपटातलं 'साकी साखी' हे गाणं खूप गाजलं. या गाण्याने आणि नोराच्या डान्सने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. सध्या सोशल मिडियावर या गाण्यावर #osakisakidancechallenge असे चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे.

'ओ साकी साकी' गाण्यावरील डान्सचे व्हिडिओ #osakisakidancechallenge हा हॅशटॅग वापरुन डान्सर्स इंस्टाग्राम, फेसूबुक, ट्विटरवर पोस्ट करत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात तिच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय

युट्युबवर ​या गाण्याने 10 करोडचा टप्पा पार केलाय. पहिल्यांदाच बॉलिवूडमधील गाण्याने इतक्या मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळविले आहेत. नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चॅलेंज स्विकारणाऱ्या काही डान्सरचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nora Fatehi's o saki saki dance challenge is viral