आता इंटरवल विसरा 

संकलन : चिन्मयी खरे 
मंगळवार, 14 मार्च 2017

मूव्ही आणि पॉपकॉर्न हे कॉम्बिनेशन ठरलेलं. इंटरवल झाला की थिएटरच्या बाहेर येऊन पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक यावर ताव मारण्याची वेगळीच मजा असते. पण इंटरवल नसेल तर? पॉपकॉर्न हुकणार... "काय पो छे' फेम राजकुमार राव याचा "ट्रॅपड्‌' हा चित्रपट येत्या 17 तारखेला प्रदर्शित होतोय. विक्रमादित्य मोटवानी यांच्या या चित्रपटात इंटरवलच नाही. पण त्यांनी असं का केलं असेल? त्यांच्या चित्रपटात राजकुमार राव एका अशा मुलाची भूमिका करतोय, जो एका घरात फसतो जेथे खायला, प्यायला, वीज, पाणी किंवा बाहेरच्या दुनियेशी काहीच संपर्क नाही.

मूव्ही आणि पॉपकॉर्न हे कॉम्बिनेशन ठरलेलं. इंटरवल झाला की थिएटरच्या बाहेर येऊन पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक यावर ताव मारण्याची वेगळीच मजा असते. पण इंटरवल नसेल तर? पॉपकॉर्न हुकणार... "काय पो छे' फेम राजकुमार राव याचा "ट्रॅपड्‌' हा चित्रपट येत्या 17 तारखेला प्रदर्शित होतोय. विक्रमादित्य मोटवानी यांच्या या चित्रपटात इंटरवलच नाही. पण त्यांनी असं का केलं असेल? त्यांच्या चित्रपटात राजकुमार राव एका अशा मुलाची भूमिका करतोय, जो एका घरात फसतो जेथे खायला, प्यायला, वीज, पाणी किंवा बाहेरच्या दुनियेशी काहीच संपर्क नाही. चित्रपटाला अधिक रोमांचक बनवण्यासाठी फॅन्टम फिल्म्स्‌ची निर्मिती असलेला ट्रॅप्ड्‌ इंटरवलशिवाय प्रदर्शित करण्यात येणार आहे. आता पुढे काय होणार, हा विचार करायला वेळ नाही. चित्रपटाची उत्कंठा तुम्हाला तहान-भूक विसरायला लावणार, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. आता इंटरवलशिवाय चित्रपट हा नवीन ट्रेंड येईल की काय, असा प्रश्‍न आहे आणि जर आलाच तर मूव्ही विथआऊट पॉपकॉर्न प्रेक्षकांना आवडेल? 
 

Web Title: Now forget interval