
कोरोना संक्रमित झालेल्या कर्मचा-यांना मुंबईतील एक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. आत्तापर्यंतच्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खानच्या ड्रायव्हरला कोरोना झाल्याची चर्चा सुरु असताना आता त्याच्या मॅनेजरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल आहे. यामुळे सलमानलाही पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन त्याच्या डॉक्टरांनी केले आहे.
इंडिया टिव्ही’ ने प्रसिध्द केलेल्या एका वृत्तातून याबद्दलची अधिक माहिती समोर आली आहे.साधारण आठवडाभरापूर्वी सलमानच्या ड्रायव्हर आणि दोन स्टार मेंबरला करोनाची लागण झाली होती. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान आणि त्याचे कुटुंबिय आयसोलेट झाले होते. कोरोना संक्रमित झालेल्या कर्मचा-यांना मुंबईतील एक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. आत्तापर्यंतच्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.
'मी पारशी ते मुस्लिम होते,धर्मांतराला माझा विरोध होता'
सलमान खान 'बिग बॉसचा १४' वा सिझन होस्ट करत आहे. सलमान आणि त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता की आता बिग बॉसच्या शूटिंगला सलमान हजर राहणार की नाही. मात्र सलमानचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याचे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीएमसीने सलमानच्या घराची सफाई केली आहे.
शाहरुखच्या गौरीनं केलं अलियाच्या घराचं इंटेरियर; किंमत फक्त 32 कोटी
जॉर्डीला कोरोनाची लागण होण्यापूर्वी सलमानच्या दोन स्टार मेंबर व कारचालकाला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी करोना चाचणी केली होती. यात सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते. यावेळी सलमान सेल्फ क्वारंटाइन असल्याचं सांगण्यात येत होतं.जॉर्डी हा सलमानचा मॅनेजर असण्यासोबतच तो सेलिब्रिटी मॅनेजर, निर्माता, गायकदेखील आहे.