
मुंबई : लॉकडाऊनमध्ये सेलिब्रेटी मंडळींनी आपले वाढदिवस कुटुंबियांबरोबर घरीच साजरे केले. एरव्ही आपल्या बर्थ डेची जोरदार पार्टी करणारे कलाकार कुटुंबियांबरोबर सेलिब्रेशन करताना दिसले. यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री नुसरत भरुचा. नुसरतने नुकताच तिचा 35वा वाढदिवस तिच्या कुटुंबियांबरोबर साजरा केला. सेलिब्रेशनदरम्यानचे फोटो, व्हिडिओज देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले. तिचे हे फोटो व व्हिडिओज प्रचंड हिट झाले. आता बॉलिवूडची ही हॉट गर्ल आता एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
नुसरत लॉकडाऊननंतर विवाह बंधनात अडकणार असल्याची आता चिन्हे दिसताहेत. खरं तर नुसरतच्या लग्नाबाबत खुद्द तिच्या आईनेच खुलासा केला आहे. नुसरतने लवकरात लवकर लग्न करावं असं तिच्या कुटुंबियांचं मत आहे. नुसरतची आई म्हणते, नुसरत अजूनही तिच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे स्थिरावलेली नाही. हे पाहून आम्हाला तिची काळजी वाटते. पण एक नक्की सांगू इच्छिते की नुसरत लवकरात लवकर विवाह बंधनात अडकणार आहे.
तिने लग्न करावं यासाठी आम्ही तिला तयार करत आहोत. आमच्या संपूर्ण कुटुंबियांनी आधीच तिला लग्नासाठी फार वेळ दिला आहे. आता अधिक वेळ आम्ही तिला देऊ शकत नाही.' नुसरतने नुकताच 35वा वाढदिवस साजरा केल्यानंतर आपल्या मुलीने लवकरात लवकर लग्न करावं अशी तिच्या आईची खूप इच्छा आहे.
विशेष म्हणजे नुसरतही तिच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये काय चाललं आहे हे आई-वडिलांना खुलेपणाने सांगते. ती म्हणते, मी आजवर माझं रिलेशनशिप माझ्या पालकांपासून लपवून ठेवलेलं नाही. माझं जर रिलेशनशिप एखाद्या मुलाबरोबर चांगलं चाललं तर मी पुढे त्याच्याशी लग्न करेन असं मी स्पष्टपणे त्यांना सांगते.' आता तर नुसरच्या कुटुंबियांनाच तिच्या लग्नाचे वेध लागले आहेत.
खरं तर छोट्या पडद्यापासून नुसरतने तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडकडे वळलेल्या या अभिनेत्रीचे सुरुवातीचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. गेल्या काही दोन ते तीन वर्षांमध्ये तिच्या करिअरची गाडी रुळावर आली आहे. ड्रिमगर्ल, सोनू के टिटू की स्वीटी यांसारखे एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट तिने केले आहेत.
nushrat bharucha mother pushes actress towards marriage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.