Koffee with Karan:'शो बंद होणार नाही तर..'; चाहत्यांसाठी आली गूडन्यूज Karan Johar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar- Koffee with Karan

Koffee with Karan:'शो बंद होणार नाही तर..'; चाहत्यांसाठी आली गूडन्यूज

करण जोहरने(Karan Johar) आज 'कॉफी विथ करण'(Koffee with karan) या आपल्या अत्यंत गाजलेल्या शो संदर्भात एक मोठी घोषणा केली अन् यामुळे चाहते मात्र नाराज झाले होते. करणनं सोशल मीडियावर आपलं एक निवेदन शेअर करत त्यात 'कॉफी विथ करण' हा आपला शो बंद होणार असल्याचं म्हटलं होतं. ही पोस्ट वाचल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या शो मधून सेलिब्रिटींचे अनेक किस्से,सीक्रेट्स याचे खुलासे व्हायचे अन् त्याची चर्चा रंगायची. त्यामुळे अर्थातच प्रेक्षक देखील हा शो पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचे. आता शो बंद होणार हे कळल्यानंतर नाराज झालेल्या चाहत्यांसाठी एक नवी अपडेट आहे आणि ती ऐकून चाहते मात्र भलतेच खूश होणार आहेत.

एका इंग्रजी वृ्त्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की करण चा शो बंद नाही तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. माहितीनुसार नवीन सिझन डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल. २०२१ मध्ये करणने 'कॉफी विथ करण' चे काही स्पेशल एपिसोड होस्ट केले होते,जे ओटीटी वरच दाखवण्यात आले होते. या एपिसोडमध्ये करणने डिस्ने प्लस हॉटस्टार एम्पायरच्या कास्टला बोलावलं होतं ज्याचं नाव होतं 'कॉफी शॉट्स'. यानंतर 'कॉफी विथ करण' मध्ये धनुष आणि सारा अली खानला बोलावलं होतं. हे दोन्ही एपिसोड डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्पेशल एपिसोड म्हणून स्ट्रीम करण्यात आले होते.

हेही वाचा: सैफला सतावतेय मोठा मुलगा इब्राहिमची चिंता; म्हणाला,'मी प्रार्थना करतो...'

करणने आज पोस्ट करत लिहिलं होतं, ''कॉफी विथ करण' माझ्या आणि आपल्या आयुष्याचा जवळपास सहा वर्ष एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. आम्ही पॉप कल्चर हिस्ट्रीमध्ये आपलं नाव केलं होतं. आणि हेच कारण आहे की मला हा शो बंद होत आहे हे सांगताना खूप दुःख होत आहे. आता हा शो पुन्हा येणार नाही''.

हेही वाचा: मंदिरा बेदीच्या आयुष्यात नवा मित्र? पूल मधल्या हॉट फोटोची रंगली चर्चा

आपल्या माहितीसाठी सांगतो की,'कॉफी विथ करण' हा चॅट शो छोट्या पडद्यावरील चर्चेतील शो पैकी एक आहे. 2004 मध्ये हा शो सुरु झाला होता. या सिझनचा पहिला एपिसोड 19 नोव्हेंबर 2004 ला प्रदर्शित झाला होता. या शो नं पहिल्या एपिसोडपासूनच चाहत्यांचं मन जिंकलं होतं. 'कॉफी विथ करण'चा शेवटचा एपिसोड 17 मार्च 2019 साली प्रदर्शित झाला होता. हा 6 व्या सिझनचा शेवटचा एपिसोड होता.

हेही वाचा: Jhund: 6 मे रोजी 'झुंड' OTT वर नाहीच? सुप्रीम कोर्टात ठरणार भवितव्य

असो,आता पहायचं की करण बोलतोय त्यात किती तथ्य आहे की हा मीडिया रीपोर्ट कळाला आहे त्यात तथ्य आहे. तसंही चाहत्यांना शो बंद होऊ नये असंच वाटत आहे आणि शो चा नवा सिझन पहायला मिळावा यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Web Title: Koffee With Karan New Update Show Will Stream On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top