२४ तासांत श्रेया बुगडेच्या दोन्ही मावशींचं कोरोनाने निधन

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर बोलताना श्रेयाला अश्रू अनावर
shreya bugde
shreya bugde

अफलातून विनोदबुद्धी आणि इतरांची हुबेहूब नक्कल करून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडेवर Shreya Bugde दु:खाचा डोंगर कोसळला. कोरोनामुळे श्रेयाने तिच्या दोन लाडक्या मावशींना गमावलं. २४ तासांत श्रेयाच्या दोन्ही मावशींचं निधन झालं. या दु:खातून सावरत ती 'चला हवा येऊ द्या'च्या Chala Hawa Yeu Dya मंचावर उपस्थित झाली. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशीने तिला बोलतं केलं. मावशींबद्दल बोलताना श्रेयाच्या अश्रूंचा बांध फुटला. (chala hawa yeu dya fame shreya bugde lost two close persons during pandemic)

"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माझ्या दोन्ही मावशींना अवघ्या २४ तासांत आमच्यापासून हिरावून घेतलं. त्या दोघींचंही माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांची मी लाडकी होते आणि असं अचानक त्या दोघी मला सोडून जातील, याचा मी कधी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता", असं सांगताना श्रेयाला अश्रू अनावर झाले.

shreya bugde
अरिजित सिंगला मातृशोक; कोरोनामुळे निधन

काही दिवसांपूर्वी श्रेयाने तिच्या दोन मावशींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 'आई, मला माहितीये त्या दोघी आपल्याला खूप लवकर सोडून गेल्या. त्यांनी आयुष्यभर तुझ्यावर खूप प्रेम केलं. पण आता आपल्याकडे त्यांच्या फक्त गोड आठवणीच आहेत. मासी तू, माँ-सी थी, तुझसे जीना तो सीखा था, अब जाना भी सीख लिया है', अशा शब्दांत श्रेयाने तिच्या भावना व्यक्त केल्या. या फोटोमध्ये लहानपणीची श्रेया तिची आई आणि दोन मावशींसोबत दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com