२०० कोटी घोटाळा प्रकरण: EDकडून चौकशीनंतर नोरा फतेहीचं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress nora fatehi

२०० कोटी घोटाळा प्रकरण: EDकडून चौकशीनंतर नोरा फतेहीचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अंमलबजावणी संचालनालयाने ED मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला Nora Fatehi गुरुवारी समन्स बजावले होते. हा खटला सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ईडीने नोराला समन्स बजावले. आता नोराच्या प्रवक्त्याने याप्रकरणी तिची बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. "नोरा या प्रकरणात बळी ठरली आहे आणि साक्षीदार असल्याने ती चौकशीत सहकार्य करत आहे, तपास अधिकाऱ्यांना मदत आहे", असं नोराच्या प्रवक्याने स्पष्ट केलं.

नोराच्या प्रवक्त्याकडून स्पष्टीकरण-

'नोरा फतेहीच्या वतीने, आम्ही विविध माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देऊ इच्छितो. नोरा फतेही या प्रकरणात बळी ठरली आहे आणि साक्षीदार असल्याने ती सहकार्य करत आहे, तपासात अधिकाऱ्यांना मदत करत आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की ती कोणत्याही मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी झाली नाही. आरोपींशी तिचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही. फक्त तपासात मदत करण्यासाठी ईडीने तिला समन्स बजावले आहेत,' असं तिच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं. याच प्रकणात यापूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

हेही वाचा: आर्यनने कारागृहातून शाहरुख-गौरीशी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद

नेमकं काय आहे प्रकरण?

रेलिगेअर कंपनीचे प्रमोटर मलविंदर आणि शिविंदर सिंग यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी सुकेश चंद्रशेखरने त्यांच्या पत्नींसोबत मिळून एक डील केली होती. यासाठी सुकेशने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. मलविंदरची पत्नी जापना आणि शिविंदरची पत्नी अदिती यांनी याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पतींना कारागृहातून बाहेर काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याची तक्रार त्यांनी केली होती. २३ ऑगस्टला तिहार जेलमधून पैशांची वसूली करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री लीना पॉल यांच्या चैन्नईतील बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. ईडीनं हा छापा टाकला होता. त्या छाप्यातून करोडो रुपये जप्त करण्यात आले होते. याशिवाय १५ गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुकेशनं एका बड्या उद्योगपतीची पत्नीकडून दोनशे कोटींची वसूली केली होती. यावेळी लीना पॉलचीही चौकशी करण्यात आली आहे.

loading image
go to top