व्हिडिओ: जेव्हा शाहरुखने ऐश्वर्यावर केलेला प्रश्नांचा भडिमार, ऐश्वर्याने दिली अशी उत्तरं..

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 5 November 2020

दोघांचा एक मजेशीर थ्रोबॅक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय जो शाहरुख आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना खूप हसवतोय.

मुंबई- शाहरुख आणि ऐश्वर्या राय यांच नाव केवळ देशभरातंच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांची ओळख जगभर पसरलेली आहे. शाहरुख आणि ऐश्वर्या यांचा वाढदिवस लागोपाठंच असतो. नुकताच त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला ज्याची धूम सोशल मिडियावर पाहायला मिळाली. याच दरम्यान दोघांचा एक मजेशीर थ्रोबॅक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय जो शाहरुख आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना खूप हसवतोय.

हे ही वाचा: अक्षय कुमारने दिली हिंट, कियारा आडवाणी करणार 'या' अभिनेत्यासोबत लग्न?  

शाहरुख आणि ऐश्वर्या त्यांच्या स्टाईलसोबतंच हजरजबाबीपणासाठी देखील ओळखले जातात. हा व्हिडिओ एका ऍवॉर्ड शो दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान ऐश्वर्याला अनेक इंग्रजी शब्दांचे हिंदीमधील अर्थ विचारतो. तर ऐश्वर्या देखील तिच्या स्वॅगमध्ये उत्तरं देताना दिसतेय. शाहरुखने सुरुवातीला ऐश्वर्याला सिनेमा, डिरेक्टर, ऍक्टर अशा अनेक शब्दांचे अर्थ विचारले ज्याची तिने सहज उत्तरं दिली मात्र शेवटी शाहरुखने तिला कॅमेराला हिंदीमध्ये काय म्हणतात असं विचारल्यावर तीने थोडा पॉज घेतला. काही सेकंद विचार केल्यानंतर तिने जे उत्तर दिलं त्यासाठी हा व्हिडिओ पाहायलाच हवा. 

ऐश्वर्याचं हे उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं तर यावर मस्करील करत शाहरुख म्हणतो पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झाली आहे. यावर ऐश्वर्या एक्सक्युज मी म्हणत त्याला टोकते आणि प्रेक्षकांना हसू आवरत नाही. शाहरुख आणि ऐश्वर्याचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडतोय. हा व्हिडिओ शाहरुखच्या एका फॅन पेजवरुनंच शेअर केला गेला आहे.    

an old video of shah rukh khan and aishwarya rai bachchan is going viral on social media  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: an old video of shah rukh khan and aishwarya rai bachchan is going viral on social media