ओडिसा येथील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा यांचा संशयास्पद मृत्यू.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ollywood actor Raimohan Parida dies by suicide

ओडिसा येथील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा यांचा संशयास्पद मृत्यू..

Raimohan Parida Dies : ओडिसा सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा (Raimohan Parida) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसात आत्महत्या करणाऱ्या कलाकारांची संख्या वाढत असतानाच ही आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Ollywood actor Raimohan Parida dies by suicide)

हेही वाचा: मल्याळम अभिनेते व्हीपी खालिद यांचे निधन, चित्रीकरण सुरू असतानाच..

रायमोहन परिदा यांचा मृतदेह भुवनेश्वरमधील प्राची विहार या त्यांच्या राहत्या घरी आढळला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. परंतु त्यांच्या निधनाचे गूढ उलगडलेले नाही. घरच्यांच्या मते त्यांना कोणत्याही प्रकारचा तनाव नव्हता. त्यांच्या निधनामुळे ओडिसा सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रायमोहन परिदा यांनी ओडिसासह अनेक बंगाली सिनेमात काम केले आहे. 'सागर' या सिनेमाच्या माध्यमातून रायमोहन परिदा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'सागर'सह त्यांनी 'बंधना', 'असिबू केबे साजी मो रानी', 'तू थिले दारा कहाकु', 'तोह बिना मो कहानी आधा', 'छाती चीरिदेले तू' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत भूमिका केल्या आहेत. ते नकारात्मक भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे. तेथील रंगभूमी आणि लोकरंगभूमीवर ही त्यांचे योगदान मोठे आहे.

Web Title: Ollywood Actor Raimohan Parida Dies By Suicide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :OdishaActorsucide case