Oh My God परेश रावल यांनी पुन्हा कांतीलाल साकारण्यास का दिला नकार?

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ओह माय गॉडनं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती.
OMG 2 Paresh Rawal
OMG 2 Paresh Rawalesakal

OMG 2 Paresh Rawal - कांतीलाल कोण, असा प्रश्न ज्यांनी ओह माय गॉड हा चित्रपट पाहिला आहे त्यांना पडणार नाही. देवाविरुद्ध कोर्टामध्ये धाव घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडणारा कांतीलाल मेहतानं असंख्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या ओह माय गॉड २ ची जोरदार चर्चा सुरु आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ओह माय गॉडनं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. आस्तिक विरुद्ध नास्तिक असा वैचारिक संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात आला होता. या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यावरुन वादही झाला. कित्येकांनी या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ नये म्हणूनही भूमिका घेतली होती. यासगळ्यात मात्र ओह माय गॉडनं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. अक्षयनं त्यात भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सध्या अक्षयच्या ओह माय गॉडच्या सेकंड पार्टची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. त्यात तो भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र यावेळी कांतीलालच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले परेश रावल या चित्रपटामध्ये दिसणार नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. ओह माय गॉड २ चा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून यावेळी परेश रावल यांच्या जागी प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार आहे.

तो ट्रेलर पाहिल्यानंतर कित्येक चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी या पार्टमध्ये परेश रावल का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. ओह माय गॉड २ ची ज्यावेळी घोषणा झाली होती तेव्हा एका मुलाखतीमध्ये परेश रावल यांनी याविषयी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, मला यावेळची स्टोरी फारशी आवडली नाही. त्यामुळे मी निर्मात्यांना या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला.

OMG 2 Paresh Rawal
Niyat Movie Review : कमजोर कथेमुळे निराश करणारा चित्रपट!

मुळात मला या चित्रपटाचा सिक्वेल का करत आहेत हेच समजले नाही, ते माझ्या आकलनापलीकडचं होतं. मी त्यांना यात काम करणार नाही हे स्पष्टपणे सांगून टाकले. कारण माझ्या वाट्याला जी भूमिका होती त्यात मी समरसून काम करेल असे मला वाटले नाही. त्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो.

OMG 2 Paresh Rawal
Shrinidhi Shetty : नजरेत जादू अशी की...!

ओह माय गॉड हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळच्या भागात लैंगिक शिक्षण हा विषय घेण्यात आला आहे.हा एक कोर्ट रुम ड्रामा असून त्याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या गदर सोबत असणार आहे. त्यामुळे गदर जिंकणार की ओह माय गॉड २ हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com