Riteish Deshmukh: रितेशला बायकोने दिलं खास बर्थडे गिफ्ट.. झोपेतून उठताच..​ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On Riteish Deshmukh’s Birthday, Wife Genelia Deshmukh gives special gift actor shared video

Riteish Deshmukh: रितेशला बायकोने दिलं खास बर्थडे गिफ्ट.. झोपेतून उठताच..​

Riteish deshmukh birthday: अभिनेता रितेश देशमुखचा काल १८ डिसेंबर रोजी वाढदिवस झाला. या निमित्ताने त्याला बॉलीवुड आणि मराठी मनोरंजन विश्वातून खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या. पण त्याच्या बायकोने म्हणजेच जेनेलीयाने त्याला एक खास सरप्राइज दिले. त्याचा एक व्हिडिओ रितेशने सोशल मीडियावर शेयर केला आहे.

(On Riteish Deshmukh’s Birthday, Wife Genelia Deshmukh gives special gift actor shared video)

हेही वाचा: Mahesh Tilekar: रमजानला मुस्लिमांच्या बिर्यानीवर ताव मारणारे नेते.. हिंदुत्वावर महेश टिळेकर आरपार..

अभिनेता रितेश देशमुख हा बॉलीवुडमधील एक सशक्त मराठी चेहरा आहे. हाऊसफुल सिरिज, हे बेबी, लय भारी, एक व्हिलन, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटांमध्ये रितेशने उत्तम अभिनय केला आहे. त्याने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. तर नुकत्याच येऊ घातलेल्या वेड चित्रपटाचे तो दिग्दर्शनही करत आहे. त्याच चित्रपटाची सध्या बरीच हवा आहे, ज्यामध्ये तो आणि जेनेलीया प्रमुख भूमिकेत आहेत. रितेश आणि जेनेलीया यांचे प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणूनच बायकोने नवऱ्यासाठी एक खास सरप्राइज अरेंज केलं होतं.

हेही वाचा: Pushkar Shrotri: रंगाचा आणि धर्माचा काय संबंध.. पुष्कर श्रोत्री कडून राम कदमांचा समाचार..

रितेश ने शेयर केलेल्या व्हिडिओ वरुन लक्षात येतंय की त्याचा हा वाढदिवस प्रचंड खास ठरला. कारण रितेशनं आई, बायको आणि दोन्ही मुलांसोबत दिवसाची खास सुरूवात केली. रितेश झोपेत असतानाच त्याची दोन्ही मुलं त्याला उठवायला गेली. झोपेतून उठताच रितेशनं मुलांना पाहिलं. रुममधून बाहेर येताच त्याला समोर आई दिसली. तो आईच्या पाया पडला आणि आईला घट्ट मिठी मारून आशीर्वाद घेतले.

यावेळी जेनेलीयानं रितेशसाठी खास सप्राइज प्लान केलं होतं. 'हॅप्पी बर्थ डे मिस्टर डिरेक्टर' असं लिहिलेलं सुंदर डेकोरेशन तिनं केलं होतं. त्यात रितेशच्या भूमिकांचे जुने फोटो कोलाज केले होते. ते पाहून रितेश आश्चर्यचकित झाला. त्यानंतर दोन्ही मुलांनी रितेशसाठी सुंदर गाणं गायलं. आय लव्ह यू बाबा... हॅप्पी बर्थ डे बाबा.. म्हणताच रितेश भावुक झाला. ही सर्व प्रसंग त्या व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत.

जिनिलीयानं दिलेलं हे सरप्राइज पाहून रितेशने जेनेलीयाला घट्ट मिठी मारली. त्यानंतर आईनं आणि जेनेलीयानं रितेशला ओवाळलं. व्हिडीओच्या शेवटी रितेशच्या 44व्या वाढदिवसानिमित्तनं जिनिलीयानं खास फ्रेम तयार केली होती. ज्यात लिहिलंय, 'इस स्टोरी में इमोशन हें, ड्रामा हें आणि खूप वेड आहे'. ही व्हिडिओ शेयर करत रितेशने ही आपले प्रेम व्यक्त केले आहे.