एक सून दोन सासू 

संकलन : भक्ती परब
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

"अँड टीव्ही'वर 6 फेब्रुवारीपासून सुरू झालेली "एक विवाह ऐसा भी' ही मालिका तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसतेय. एक सून आणि दोन सासू हे वेगळेपण तर आहेच. पण ते कसे हे बघण्यासाठी ही मालिका एकदा जरूर बघा. या मालिकेच्या विषयामुळे अँड टीव्हीवरील इतर मालिकांमध्ये ही मालिका अनेकांना आवडू लागलीय. या मालिकेची कथा सुमन परमार या नायिकेभोवती फिरते. सुमन ही विधवा आहे. तिला 5-6 वर्षांचा एक मुलगा आहे. ती, सासू, दोन नणंदा आणि तिचा छोटा मुलगा असं सुमनचं हे छोटं मध्यमवर्गीय कुटुंब आहे. सुमन ब्युटी पार्लर चालवते. त्यात तिला तिच्या दोघी नणंदा मदत करतात. त्यावरच त्यांचं घर चालतं.

"अँड टीव्ही'वर 6 फेब्रुवारीपासून सुरू झालेली "एक विवाह ऐसा भी' ही मालिका तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसतेय. एक सून आणि दोन सासू हे वेगळेपण तर आहेच. पण ते कसे हे बघण्यासाठी ही मालिका एकदा जरूर बघा. या मालिकेच्या विषयामुळे अँड टीव्हीवरील इतर मालिकांमध्ये ही मालिका अनेकांना आवडू लागलीय. या मालिकेची कथा सुमन परमार या नायिकेभोवती फिरते. सुमन ही विधवा आहे. तिला 5-6 वर्षांचा एक मुलगा आहे. ती, सासू, दोन नणंदा आणि तिचा छोटा मुलगा असं सुमनचं हे छोटं मध्यमवर्गीय कुटुंब आहे. सुमन ब्युटी पार्लर चालवते. त्यात तिला तिच्या दोघी नणंदा मदत करतात. त्यावरच त्यांचं घर चालतं. आणि या मालिकेची अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे सुमनने एमबीएसाठी एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आहे. त्यामुळे आता तिने घर, ब्युटी पार्लर आणि एमबीए असं तीन ठिकाणी नीट लक्ष देण्यासाठी एक वेळापत्रकच आखून घेतलंय. आणि एमबीएसाठी कॉलेजमध्ये गेल्यावर तिची गाठ पडते रणवीर मित्तल या श्रीमंत मुलाशी. पुढे मालिकेत ती त्याच्याशी लग्न करणार आहे आणि त्यानंतर सुमन परमार ही मित्तल खानदानाची बहू बनणार आहे. सुमनची भूमिका सोनाली निकम करतेय. अगदी बरोबर ओळखलंत. सोनाली तीच; जी "आधे अधुरे' या जिंदगी चॅनेलवरील वादग्रस्त तरीही लोकप्रिय मालिकेची नायिका होती. सोनाली निकमसोबत अभिषेक मलिक मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. सध्या या मालिकेत दोघांमध्ये कट्टर दुश्‍मनीचा टॅक सुरू आहे आणि लवकरच त्यांची ही भांडणं त्यांना प्रेमाने अधिक जवळ येण्यात मदतगार ठरणार आहेत. म्हणजे सध्या एकमेकांचा चेहरा न बघणारे हे दोघे लवकरच प्रेमात पडणार पडणार किंवा हीच टशन आणि खुन्नसमुळे त्यांचं लग्न दाखवून त्यानंतर त्यांच्या आयुष्यात प्रेम येतं, असा काहीसा प्रवास या दोघांचा असणार आहे. त्यामुळे या मालिकेतील नायिका सुमनला पहिल्या लग्नामुळे एक सासू आणि नंतर मित्तल खानदानची बहू झाल्यावर एक सासू अशा दोन सासूंचं प्रेम मिळणार आहे. तिच्या या दोन सासवांची भूमिका हिमानी शिवपुरी आणि तस्नीम शेख या दोघी प्रसिद्ध अभिनेत्री साकारत आहेत. त्या दोघींच्या अभिनयाची जुगलबंदीही या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आपल्या विधवा सुनेने एमबीए करावं म्हणून धडपडणारी सासू आणि दुसरीकडे तिचा राग राग करणारी सासू, अशा दोन सासवांचं मन सुमन कशी जिंकणार आणि तिचं दुसऱ्या नवऱ्याशी म्हणजेच रणवीरशी नातं कसं फुलत जाणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारं असे,ल हे मात्र नक्की. 

Web Title: one daughter in lawand one mother in law ek vivah aisa bhi