Onkar Bhojane: गोस्वामी सरांची "ती" गोष्ट कायम लक्षात.. हास्यजत्रेतून बाहेर पडल्यावर ओंकार पहिल्यांदाच हे बोलला

ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला
Onkar Bhojane. Onkar Bhojane news, Onkar Bhojane maharashtrachi hasyajatra video. maharashtrachi hasyajatra , onkar bhojane girlfriend, Onkar Bhojane family
Onkar Bhojane. Onkar Bhojane news, Onkar Bhojane maharashtrachi hasyajatra video. maharashtrachi hasyajatra , onkar bhojane girlfriend, Onkar Bhojane familySAKAL

Onkar Bhojane exclusive interview on Ssakal Unplugged: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. ओंकारने हास्यजत्रा जरी सोडली असली तरी विविध माध्यमांमधून तो फॅन्सच्या संपर्कात राहिला.

त्याच्या अभिनयाची जादू सर्वांना दाखवत राहिला. ओंकार सध्या 'करून गेलो गाव' या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून 'हाऊसफुल्ल'च्या पाट्या झळकत आहेत. याच निमित्ताने हरहुन्नरी ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला.

यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा जरी सोडली असली तरी हास्यजत्रेचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामींची कोणती गोष्ट ओंकारच्या कायम लक्षात राहिली याचा खुलासा त्याने केलाय.

(Onkar Bhojane Always remember sachin Goswami "that" story.. Onkar said this for the first time after leaving maharashtrachi hasyajatra)

सचिन गोस्वामींनी काय शिकवलं. सचिन गोस्वामींची कोणती गोष्ट लक्षात राहिली याविषयी ओंकार म्हणाला..

"सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, आशिष पाठारे हि माझी आवडती माणसं.. माझं खूप कमी आवडती माणसं ही त्यापैकीच एक.. यांच्याकडे काहीतरी वेगळंच समीकरण..

Onkar Bhojane. Onkar Bhojane news, Onkar Bhojane maharashtrachi hasyajatra video. maharashtrachi hasyajatra , onkar bhojane girlfriend, Onkar Bhojane family
Shital Kshirsaagar: आधी हाताला चटके.. माझी तुझी रेशीमगाठ मधील अभिनेत्रीने चुलीवर थापली भाकर

ओंकार पुढे म्हणाला.. "एखादं स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला काही लक्षात नाही या स्क्रिप्ट मध्ये नेमकं काय आहे..

तर गोस्वामी सर फक्त एका दिवसात ते पूर्ण उलत सुलट करून त्या कॅरेक्टरचं एक वेगळंच चित्र तयार करतात. तुम्ही बोलता माझं हे कॅरेक्टर फेव्हरेट आहे.

लोकांना आवडलं तर ते सगळे कॅरेक्टर त्यांच्याशी बोलता बोलता improvised व्हायचे. त्यापैकी कोणतंही कॅरेक्टर आधी लिखित नव्हते. गोस्वामी सरांशी बोलता बोलता improvised व्हायचं..

Onkar Bhojane. Onkar Bhojane news, Onkar Bhojane maharashtrachi hasyajatra video. maharashtrachi hasyajatra , onkar bhojane girlfriend, Onkar Bhojane family
Prajakta Mali: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताने 'लग्नाळुंसाठी' केली ही मोठी घोषणा

ओंकार शेवटी म्हणतो.. मग सर म्हणायचे Yes..! आपण आता हे continue करूया.. सहज एखाद्या गोष्टीत इतकी मजा शोधणं.. किंवा हे कस त्यांना सुचतं किंवा काय हे आम्हाला कोणालाच कधी कळलं नाही..

आम्हाला याचं खुप कौतुक वाटायचं.. सरांबरोबर राहून आपण हे शिकून ठेवूया,, हेच पुढे आपल्यासोबत राहणार आहे.. याची मला जाणीव झाली.

सोबत त्याचं प्रेम, कॉलेज लाईफ, क्रश, हास्यजत्रा अशा अनेक गोष्टींचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला. ही सविस्तर मुलाखत ऐकण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com