Onkar Bhojane: क्रश तर नाय पण 'या' इन्फ्लुएन्सरचा ओंकार आहे चाहता! म्हणाला, मला तिचा स्वभाव..

Onkar Bhojane
Onkar BhojaneEsakal

आपल्या अभिनयाने आणि दमदार विनोदाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतल नावं झालं आहे.

Onkar Bhojane
Badshah Music Video Controversy: बादशाहला 'सनक' पडलं महागात! अखेर तक्रार दाखल..

त्याला या शोमध्ये लोकप्रियता मिळाली. तो मराठीतला कॉमेडी किंग म्हणून नावारुपाला आला आहे. त्याचा परफॉर्मन्स, विनोदाचं टायमिंग हे सारं कमालीचं प्रभावी असल्याचे तो अल्पावधितच लोकप्रिय झाला. त्यामुळेच त्याने शो सोडल्यानंतरही त्याची चर्चा रंगली.

शो सोडल्यानंतर ओंकारनं 'सरला एक कोटी' या मराठी सिनेमात प्रमुख भूमिका साकरली. ही त्याचा पहिलाच मुख्य भुमिकेतील चित्रपट होता. या चित्रपटातुन त्यांन कमाल केली आणि चाहत्यांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली. त्याची फॅन फॉलोविंगही तगडी आहे.

Onkar Bhojane
Onkar Bhojane: प्रेमापासून चार हात लांब आहे मी.. असं का म्हणाला ओंकार भोजने...

ओंकार हा जरी सोशल मिडियावर जरा कमी सक्रिय असला तरी तो त्याच्या चाहत्यांच्याशी कनेक्ट राहतो. 'सरला एक कोटी' या चित्रपटानंतर त्याची पुन्हा चर्चा रंगली आहे. त्याच कारण म्हणजे त्याच नवीन व्यावसायिक नाटक 'करून गेलो गाव'

ओंकारच्या 'करून गेलो गाव' या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून त्याच हे नाटक हाऊसफुल्ल झालं आहे. याच निमित्ताने ओंकारशी सकाळने दिलखुलास गप्पा मारल्या.

नुकतच हरहुन्नरी ओंकारनं ईसकाळला पॉडकास्ट मुलाखत दिली. यामुलाखचतीत त्यानं अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचा शो ते या चित्रपट प्रवास आता नाटकाचा अनुभव, त्याचं यश पाहिल्यानंतर घरच्याची प्रतिक्रिया या अनेक विषयवार ओंकारने या unplugged पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या आहेत

Onkar Bhojane
TV Celebs Eid 2023: 'गोपी बहू'ने साजरी केली लग्नानंतर पहिली ईद तर इतर कलाकारांचंही दणक्यात सेलिब्रेशन..

ओंकारनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीची लिंक बातमीत जोडली आहे. तर ती नक्कीच ऐका..

यावेळी ओंकारला जेव्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं म्हणजेच प्रेमाबद्दल त्याला काय वाटत तो कुणाच्या प्रेमात आहे का असं जेव्हा त्याला विचारल तेव्हा त्यानं स्पष्टचं सांगतिलं की, "प्रेम हे ठरवून होत नाही, मला ते कधी झालं नाही. मी पहिल्यापासूनच या सगळ्या भानगडीत पडत नाही. लग्नाची सगळी जबाबदारी घरच्यांनी आणि मित्र परिवारांनी घेतली असल्यामुळे त्याचा विचार करण्याची आता काही गरज नाही".

Onkar Bhojane
Onkar Bhojane: ओघाओघाने अभिनेता झालो.. नाहीतर.. 'या' क्षेत्रात ओंकार भोजनेला करायचं होतं करियर..

त्यावेळी ओंकारची मराठी मनोरंजन विश्वातील कुणी अभिनेत्री क्रश आहे का असं जेव्हा त्याला विचारलं तेव्हा मात्र त्याने सांगितलं की, असं क्रश नाही मात्र त्याला 'कोकण हार्टेड गर्ल' ही त्याला खुप आवडते तो तिला फॉलोही करतो. तिचा स्वभाव त्याला खुप आवडतो. ती ज्याप्रकारे काही सामाजिक मुद्दे उचलून धरते..त्या प्रकरणावर बोलते..त्यामुळे तिला फॉलो करायला ओंकारला आवडतं. तो तिचा फक्त एक फॅन आहे हे मात्र ओंकारनं आवर्जून सांगितलं.

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर ही सोशल मिडियावरील खुपच प्रसिद्ध चेहरा आहे. ती तिचे व्हिडिओ मालवणी भाषेत करते. तिची तरुणांमध्ये खुपच क्रेझ आहे. तिचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com